खेडी खुर्द येथे समाजकंटकाने दोन हजार केळीची रोपे कापली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:10 PM2018-10-23T23:10:05+5:302018-10-23T23:12:49+5:30
खेडी खुर्द येथील शेतकरी सतीश आनंदा सोनवणे यांच्या शेतातील दोन हजार केळीचे रोपे अज्ञात समाजकंटकाने कापून फेकल्याची घटना घडली.
कढोली, ता.एरंडोल : खेडी खुर्द येथील शेतकरी सतीश आनंदा सोनवणे यांच्या शेतातील दोन हजार केळीचे रोपे अज्ञात समाजकंटकाने कापून फेकल्याची घटना घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात तकक्रार देण्यात आली आहे. कृषी विभागाने पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
सतीश सोनवणे यांनी गावातूनच ४० हजार रुपये उसनवारी करून केळी पीक लावले होते. पीक सहा महिन्यांची असताना अज्ञात व्यक्तीने कापून फेकल्याने अडचणीत भर पडली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. धानोरा शिवारातील गट नं.५८/२ मधील केळीचे पीक खोडसाळपणे नुकसान करण्याच्या हेतूने दोन हजार रोपे कापल्याने तीन ते चार लाख रुपये नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तसेच भादंवि कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.