सुधारीत वेतन निश्चितीच्या टिपणीसाठी जळगावात घेतली दोन हजाराची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 06:36 PM2018-07-27T18:36:32+5:302018-07-27T18:40:39+5:30

पदोन्नती अंतर्गत सुधारीत वेतन निश्चितीच्या प्रकरणाची टिपणी सकारात्मक लिहून हे प्रकरण वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील मुख्य लिपिक अजित रामदास सालकर (वय ५२, रा.शासकीय निवासस्थान, सागर पार्कजवळ, जळगाव) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले.

A two thousand bribe took place in Jalgaon for comment on improved pay | सुधारीत वेतन निश्चितीच्या टिपणीसाठी जळगावात घेतली दोन हजाराची लाच

सुधारीत वेतन निश्चितीच्या टिपणीसाठी जळगावात घेतली दोन हजाराची लाच

Next
ठळक मुद्देजळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईउच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील मुख्य लिपीकास अटकजिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : पदोन्नती अंतर्गत सुधारीत वेतन निश्चितीच्या प्रकरणाची टिपणी सकारात्मक लिहून हे प्रकरण वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील मुख्य लिपिक अजित रामदास सालकर (वय ५२, रा.शासकीय निवासस्थान, सागर पार्कजवळ, जळगाव) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले.
भुसावळ येथील एका तक्रारदाराचे प्रकरण अजित सालकर यांच्याकडे होते. त्यांनी सकारात्मक टिपणीसाठी १३ जून रोजी तक्रारदाराकडे दोन हजाराची मागणी केली होती. त्यामुळे या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या पथकाने त्याच दिवशी तक्रारीची पडताळणी केली होती. लाच मागितल्याबाबत खात्री झाल्यानंतर उपअधीक्षक ठाकूर यांनी त्यांच्या पथकासह शुक्रवारी प्रशासकीय इमारतीच्या परिसरात असलेल्या सह संचालक कार्यालयातच सरकारी पंचासमक्ष सापळा लावला. दोन हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A two thousand bribe took place in Jalgaon for comment on improved pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.