महामार्गावर दोन ट्रकच्या धडकेत चालकासह दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:12 PM2019-01-25T12:12:07+5:302019-01-25T12:13:29+5:30

इंजिनमध्ये अडकला मृतदेह

Two trucks collided with two trucks on the highway | महामार्गावर दोन ट्रकच्या धडकेत चालकासह दोन ठार

महामार्गावर दोन ट्रकच्या धडकेत चालकासह दोन ठार

googlenewsNext
ठळक मुद्देकोळसा ट्रकमधील दोन्ही भाऊ जखमी


जळगाव/नशिराबाद : नागपूर येथून कोळसा घेऊन येणारा व जळगाव येथून सिमेंट घेऊन जाणारा असे दोन ट्रक एकमेकावर धडकल्याने दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजता तरसोद फाट्याजवळ झाला. अपघातांमुळे तीन तासांपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पोपट पांडुरंग पठारे (५०, रा.शाहू नगर) व चालक गयास गंभीर पिंजारी (६८ रा.कासमवाडी) अशी या मृतांची नावे आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील कणसे ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (क्र.एम.एच ०४ए.एल ६७४९) जळगावातील मालधक्क्यावरुन सिमेंट घेऊन भुसावळ येथे जात होता. या ट्रकवर चालक म्हणून गयास गंभीर पिंजारी, हमाल पोपट पांडुरंग पठारे व अफसर असली अहमद अली हे होते. हा ट्रक तरसोद फाट्याजवळ असताना समोरुन कोळसा घेऊन येत असलेला ट्रक (क्र.एम.एच.४० ए.के.७५९५) समोरासमोर धडकले. कोळशाचा ट्रक करनालसिंग मुलतानी यांच्या मालकीचा आहे. दरम्यान, पठारे यांना पत्नी व मुलबाळ नाही. ते भावाकडेच रहायचे तर कधी मालधक्कयावरच आपली रात्र काढत असे. गयास पिंजारी यांच्या पश्चात पत्नी बानोबी व शकील, सलीम, आसीफ हे तीन मुले तर मुलगी शबनम असा परिवार आहे.
या अपघातात सिमेंटच्या ट्रकच्या कॅबिनचा चुराडा झाला. चालक पिंजारी याचा मृतदेह कॅबीनमध्ये अडकला होता. जोरदार धडक बसल्याने मागील सिमेंटच्या गोण्या या थेट कॅबिन तोडून चालक व हमालांच्या अंगावर आल्या. यात तीनही जण गोण्यांमध्ये दाबले गेले. यात पोपट पठारे याचा जागीच मृत्यू झाला तर चालक पिंजारी यांचा उपचार सुरु असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. क्रेन मागवून कॅबिनमध्ये अडकलेला मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यात आले.

कोळसा ट्रकमधील दोन्ही भाऊ जखमी
अपघातानंतर सिमेंटच्या ट्रकमधील चालक गयास पिंजारी व अफसर अली अहमद अली (वय ४५ रा. पिंप्राळा हुडको) तसेच कोळशाचा ट्रकमधील चालक राजेश दत्तू ठाकरे (वय ४३) व अतुल दत्तू ठाकरे (वय ३५ दोन्ही रा. पिंपळा, नागपूर हे दोन्ही बंधू किरकोळ जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अफसर अली गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातामुळे ठाकरे बंधू कमालीचे घाबरलेले होते.
कामाच्या पैशांपोटी क्रेनचालकाने नेल्या ट्रकच्या बॅटऱ्या... पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी क्रेनचालकाला फोन केला. ट्रक बाजूला केल्यानंतर या कामाचे पोलिसांकडून पैसे न मिळाल्याने के्रनचालकाने कोळशाच्या उभ्या ट्रकमधील बॅटºया काढून नेल्या. उपचारानंतर ठाकरे बंधू परतल्यावर पोलिसांनी त्यांना प्रकार लक्षात आणून दिला. यानंतर ठाकरे पैसे देण्यास तयार झाल्यावर के्रनचालकाशी संपर्क साधून बॅटºया परत करण्यात आल्या. अपघाताची माहिती मिळताच कणसे ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक योगेश सुरेश महाजन हमालांसह घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेले सिमेंटच्या गोण्या हटविल्या. यात ५ लाखांचे नुकसान झाल्याचे योगेश महाजन यांनी सांगितले. सिमेंट रस्त्यावर पडल्याने धूळ उडून त्याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
पोलिसांची दमछाक
अपघाताची माहिती मिळताच पाळधी महामार्ग पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरिक्षक दिलीप पाटील यांच्यासह मसराज जाधव, सोपान पाटील, रफीक तडवी, गजानन पाटील, चंद्रकांत सोनार, पंकज देशमुख यांनी घटनास्थळ गाठले. दुसºया बाजूने नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल, उपनिरिक्षक गणेश हिवरकर, वाहतूक कर्मचारी रवींद्र इंधाटे, युनूस शेख, सतीश पाटील, किरण हिवराळे, असदम सय्यद यांनीही घटनास्थळ गाठले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी या पोलिसांची दमछाक झाली. अपघातग्रस्त सिमेंटचा ट्रक हटविण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. रस्त्यातील सिमेंटच्या गोण्याही बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दोन्ही बाजूने २ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: Two trucks collided with two trucks on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात