दोन दुचाकींच्या धडकेत जानव्याचा दूध विक्रेता ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:34+5:302021-06-28T04:12:34+5:30
आधार लखा उर्फ लक्ष्मण पाटील (४२, जानवे) हे दररोज दूध विक्रीसाठी धुळे येथे जात असतात. २६ रोजी ते रात्री ...
आधार लखा उर्फ लक्ष्मण पाटील (४२, जानवे) हे दररोज दूध विक्रीसाठी धुळे येथे जात असतात. २६ रोजी ते रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास धुळ्याहून दूध विक्री करून मोटारसायकल (एमएच १९ बीई ८७९०) ने परत जानवे गावी येत असताना डांगरजवळील तांबोडे नाल्याजवळ रमेश पाटील यांच्या शेतासमोरून जानवे गावाकडून येणाऱ्या मोटारसायकल (एमएच १९ डीडी २७१) वरील चालकाने वेगाने व हयगय न करता मोटारसायकल चालवून जोरात धडक दिल्याने आधार पाटील खाली पडले.
त्यांच्या तोंडाला डोक्याला मार लागला. घटनेचे वृत्त कळताच सुभाष भिला पाटील, गोपाळ शांताराम पाटील, भय्या वसंत पाटील, संजय सुभाष पाटील, रवींद्र रमेश पाटील यांनी धाव घेतली. १०८ रुग्णवाहिका मागवली. मात्र, डॉक्टरांनी आधार पाटील याला मृत घोषित केले. त्याचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. दुसरा मोटारसायकलस्वार डांगर येथील असल्याचे समजते, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत. दरम्यान, आधार पाटील यांच्या मोटारसायकलला कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिली होती. ते खाली पडलेले असल्याने त्यांच्या मोटरसायकलवर चंदू जाऊन आदळल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
===Photopath===
270621\27jal_6_27062021_12.jpg
===Caption===
आधार लखा उर्फ लक्ष्मण पाटील