गुरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली
By admin | Published: April 25, 2017 12:28 AM2017-04-25T00:28:07+5:302017-04-25T00:28:07+5:30
चोपडा : 11 बैलांसह सहा लाखांचा ऐवज जप्त
चोपडा : विनापरवाना गुरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडण्यात आली. त्यात दोन वाहने व 11 बैलांसह सहा लाख रुपयांचा ऐवज चोपडा शहर पोलिसांनी जप्त केला असून यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, पहिल्या घटनेत सकाळी सहा वाजता पोलीस कॅान्स्टेबल प्रवीण मांडोळे यांनी धरणगाव नाक्याजवळ चारचाकी (क्र. एमएच 13-आर 0344) पकडले. त्यातून एक लाख 40 हजार किमतीचे सहा बैल व दीड लाख किमतीचे वाहन असा दोन लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी अनिल राजाराम माळी व गाडीमालक नईम शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अनिल माळी यास अटक केली आहे. तपास एएसआय दत्तात्रय पाटील करीत आहेत.
दुस:या घटनेत दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नागलवाडी रस्त्यावर चिंच चौकातून मध्य प्रदेशाकडे जाणा:या वाहनातून (क्र. जीजे 06-एटी 314) पाच बैलांची वाहतूक होत होती. राहुल सुकलाल महाजन यांच्या तक्रारीवरून आरोपी चालक रमेश गंगाराम कोळी (रा.घुमावल), वाहन मालक भरत हिंमत चौधरी (चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोघांना अटक केली आहे. बैलांची किमत एक लाख दहा हजार तर दोन लाख रुपयांचे वाहन असा तीन लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार भास्कर ठाकूर करीत आहेत. (वार्ताहर)