झाडाझुडपात लपवलेल्या दोन गावठी पिस्तुल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:15 AM2021-04-16T04:15:48+5:302021-04-16T04:15:48+5:30
फोटो : ८.०९ वाजताचा मेल : संशयित आरोपी विजय शिंदे ८.१० वाजताचा मेल : संशयित आरोपी किशोर शिंदे ८.१० ...
फोटो : ८.०९ वाजताचा मेल : संशयित आरोपी विजय शिंदे
८.१० वाजताचा मेल : संशयित आरोपी किशोर शिंदे
८.१० वाजताचा मेल : संशयित आरोपी राहुल शिंदे
८.११ वाजताचा मेल : गोळीबारात वापरलेल्या दोन गावठी पिस्तुल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : व्हॉट्सॲपवर चिथावणी देणारे स्टेटस् ठेवल्याच्या कारणावरून रविवारी चौघुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबार झाला होता. याप्रकरणी संशयितांनी गुरूवारी गोळीबारात वापरलेल्या दोन गावठी पिस्तुल कांचन नगरातील बिंदूबाई मंगल कार्यालयाच्या मागील परिसरातील झुडपातून पोलिसांना काढून दिली.
विजय शिंदे याने व्हॉट्सॲपवर चिथावणी देणारे स्टेटस् ठेवले होते. याचा जाब विचारण्यासाठी विक्रम सारवान व त्याच्यासह काहीजण रविवारी सायंकाळी चौघुले प्लॉट भागात आले होते. त्यावेळी सारवान व शिंदे गटात उफाळून आल्याने गोळीबार झाला. या गोळीबारात विक्रम सारवान याच्या कानाला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला होता. त्यानंतर याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात विजय शिंदे, राहुल शिंदे, किशोर शिंदे, राकेश साळुंखे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी एलसीबीच्या पथकाने विजय शिंदे याला पाळधीतून अटक केली होती. किशोर व राहुल यांनाही शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता, १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अखेर पिस्तुलचा लागला शोध
या गुन्ह्यात वापरलेल्या गावठी पिस्तुलांचा पोलीस शोध घेत होते. अखेर विजय, राहुल व किशोर यांनी गोळीबारासाठी दोन पिस्तुलांचा वापर केला असल्याची माहिती तपासात समोर आली. कांचन नगरातील बिंदूबाई मंगल कार्यालयाच्या मागील भागातील झाडाझुपडपांमध्ये दोन्ही पिस्तुले लपवली असल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने दोन्ही पिस्तुले जप्त केली.
यांनी केली कारवाई
एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, स्वप्नील नाईक, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, अमोल कवडे, गिरीश पाटील, अमित बाविस्कर, आदींनी ही कारवाई केली.