भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दोन तरुणांना उडविले; जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 11:35 PM2019-12-10T23:35:23+5:302019-12-10T23:35:40+5:30

महामार्गावर खोटे नगरजवळ अपघात

A two-wheeler aboard a truck loaded with bicycles; two Intimate Friends Death | भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दोन तरुणांना उडविले; जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दोन तरुणांना उडविले; जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Next

जळगाव : पाळधीकडून जळगाव शहरात येत असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने विवेक उर्फ विक्की पंढरीनाथ नन्नवरे (२९, रा.बांभोरी, ह.मु.आहुजा नगर, जळगाव) व  हेमंत चंद्रहास ललवाणी (३४, मुळ रा.पहूर, ता. जामनेर ह.मु.आहुजा नगर, जळगाव) हे दोन्ही मित्र जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी चार वाजता महामार्गावर खोटे नगराजवळील जकात नाक्याजवळ झाला. दरम्यान, दुचाकीला धडक देण्याआधी ट्रकने रिक्षाला धडक दिली, त्यात रिक्षा उलटली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  विवेक व हेमंत हे दोघं मित्र आहेत. विवेक शेती व्यवसाय तर हेमंत जैन कंपनीत कंत्राटी कामगार होता. मंगळवारी दुपारी दोघं जण एका बांभोरी परिसरातील हॉटेलमध्ये जेवले, त्यानंतर शहरात येत असताना जकात नाक्याजवळ समोरुन येणाºया ट्रकने रिक्षाला (क्र.एम.एच.१९ बी.जे.२०४) धडक दिली. त्यात रिक्षा रस्त्याच्याकडेला जावून उलटली. त्यानंतर ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने विक्की व हेमंत दोघं जण जागेवरच गतप्राण झाले. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला.

अपघात झाल्यानंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णवाहिकेतून दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविले.तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. यावेळी दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.

विक्कीची घटनास्थळावर तर हेमंतची रुग्णालयात पटली ओळख

विक्की याची घटनास्थळीच ओळख पटली तर हेमंत ललवाणी याची ओळख पटत नव्हती. दोघं मित्र असल्याने तो हेमंतच असावा असा अंदाज लावण्यात आला.सायंकाळी हेमंत याचा लहान भाऊ दिपक ललवाणी व नातेवाईक यांनी रुग्णालयात धाव घेतली. मृतदेह पाहिल्यानंतर हेमंत ललवाणी याची ओळख पटली. हेमंत हा अविवाहित असून सहा महिन्यांपूर्वी त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची धुरा तो सांभाळत होता. त्याच्या पश्चात  आई ज्योती व भाऊ दीपक असा परिवार आहे. मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर आईने रूग्णालयात आक्रोश केला.

विक्की व हेमंत जिवलग मित्र..

विवेक नन्नवरे याचे वडील पंढरीनाथ नन्नवरे एस.टी. विभागात सहायक वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आई मंगला गृहीणी तसेच पत्नी रूपाली, चार वर्षीय मुलगा चिन्मय, भाऊ उमेश , बहिण पूनम असा परिवार आहे. भाऊ उमेश हा  कंपनीत कामाला आहे. दोघा जिवलग मित्रांच्या अपघाती मृत्यूबददल बांभोरी तसेच आहुजानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांत उशिरापर्यंत पंचनामा तसेच कारवाई सुरू होती.

Web Title: A two-wheeler aboard a truck loaded with bicycles; two Intimate Friends Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.