भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:10 AM2020-06-10T11:10:55+5:302020-06-10T11:11:05+5:30

जळगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दौलत उत्तम शेरे (४०, सुप्रीम कॉलनी) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार ...

Two-wheeler killed in Bhardhaw truck collision | भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next

जळगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दौलत उत्तम शेरे (४०, सुप्रीम कॉलनी) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी औरंगाबाद रस्त्यावर सुप्रिम कॉलनीत घडली. दरम्यान, अपघातानंतर तणाव निर्माण झाल्याने चालकाने ट्रक सोडून पलायन केले. पोलिसांनी लागलीच धाव घेतल्याने मोठी घटना टळली. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलत शेरे हा तरुण एमआयडीसीत मिळेल तेथे हमाली काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. मंगळवारी सायंकाळी कामावरुन दुचाकीने (एम.एच.२१ एफ.१६७६) घरी येत असताना सुप्रीम कॉलनीकडून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने (एम.एच.०४ एफ.डी.२०१३) टिपू सुलतान चौकाजवळ दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यात दौलत याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच गतप्राण झाला.
या अपघाताची माहिती मिळताच उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, महेंद्रसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, स्वप्नील पाटील, भूषण सोनार व माजी सैनिक रवींद्र बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृताला तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.

गर्दीवर मिळविले नियंत्रण
या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवून नागरिकांची समजूत घातली. पलायन केलेल्या ट्रक चालकाचे नाव मुस्ताक अहमद अब्दुल नबी (रा.चोपडा, ह.मु.सुप्रीम कॉलनी) असे असल्याचे समजले. पोलिसांनी त्यास ट्रान्सपोर्ट नगरातून ताब्यात घेतले. हवालदार शिवदास चौधरी यांनी पंचनामा केला. तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in Bhardhaw truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.