भुसावळात इंधन दरवाढीविरोधात राकाँचे दुचाकी ढकल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 01:43 AM2018-09-02T01:43:50+5:302018-09-02T01:44:10+5:30
पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा सहभाग
भुसावळ, जि.जळगाव : इंधन दरवाढ, शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान, पीकविम्याची रक्कम मिळावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने येथील विश्रामगृहापासून दुचाकी ढकल आंदोलन करण्यात आले. या वेळी शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात येवून प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेलची दररोज होणारी दरवाढ केंद्र व राज्य शासनाने थांबवावी, पीक विम्याची रक्कम व बोंडअळीचे अनुदान अद्यापपर्यंत शेतकºयांना मिळालेले नाही, काही शेतक-यांना कमी जास्त अनुदान देण्यात येवून त्यांची चेष्टा करण्यात आली आहे. तसेच शेतक-यांना बोंडअळी, पीक विम्याचे अनुदान जास्तीत जास्त मिळावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, राकाँ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, ओबीसी सेलचे तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, प्रदेश सदस्य पोपटराव पाटील, तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य रवींद्र पाटील, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नाना पवार, शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, पं.स.माजी सभापती राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,शहराध्यक्ष पवन मेहरा,आयटी सेलचे शहराध्यक्ष नीलेश निमसे, जिल्हा संघटक मंगेश पाटील, तालुका उपाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा प्रतिनिधी सुभाष पाटील, विलास पाटील, युवराज पाटील, ग्रा.पं.सदस्य दिनेश चौधरी यांच्या स्वाक्षºया आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुचाकी ढकलून हे अनोखे आंदोलन करण्यात आल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली होती. आंदोलनप्रसंगी भाजपा सरकारच्या विरोधात कार्यकर्ते व पदाधिकाºयांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती.