दुचाकी चोर पारदर्शीचा चोरीच्या कामातही पारदर्शकता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:25+5:302021-05-14T04:16:25+5:30

चोरलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट बदलल्याच नाहीत : जुगारासाठी चोरल्या १५ दुचाकी फोटो जळगाव : अक्षय्य तृतीयेसाठी रंगणाऱ्या जुगाराच्या डावात खेळायला ...

Two-wheeler thief transparency Transparency in theft work! | दुचाकी चोर पारदर्शीचा चोरीच्या कामातही पारदर्शकता !

दुचाकी चोर पारदर्शीचा चोरीच्या कामातही पारदर्शकता !

Next

चोरलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट बदलल्याच नाहीत : जुगारासाठी चोरल्या १५ दुचाकी

फोटो

जळगाव : अक्षय्य तृतीयेसाठी रंगणाऱ्या जुगाराच्या डावात खेळायला पैसे लागणार असल्याने पारदर्शी उल्हास पाटील (वय २० रा. पिंपळगाव बु. ता. जामनेर) याने जळगाव शहरातून चक्क १५ दुचाकी चोरल्याचे उघड झालेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी त्याला अटक केली.

अनेक चोर वाहने चोरल्यानंतर सर्वात आधी त्यांचे नंबरप्लेट बदल करतात. पारदर्शीने मात्र एकाही दुचाकीचा नंबर किंवा नंबरप्लेट बदल केली नाही. त्यात पारदर्शकता ठेवून त्याने नातेवाइकांना तसेच ओळखीच्या लोकांना या दुचाकी विक्री केल्या. नंबरप्लेट न बदलण्यामागे संशय येऊ नये हेच एकमेव कारण असल्याचे तपासात पुढे आले आहे. कुटुंबात कोणाला तरी कोरोना झालेला आहे, त्यासाठी पैसे लागणार असल्याचे कारण सांगून तो या दुचाकी गहाण ठेवायचा.

शहरातून एमआयडीसी, शनिपेठ, शहर व जिल्हापेठ या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याने या १५ दुचाकी चोरलेल्या असून पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत.

वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना पाहता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जिल्ह्यासह शहरातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, उमेश गोसावी, वसंत लिंगायत, महेश महाजन, अशोक पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक रवाना केले होते. जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील पारदर्शी उल्हास पाटील हा तरुण जळगाव शहरात येऊन दुचाकी चोरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला गुरुवारी अटक केली. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून ६, जिल्हापेठ ७, जळगाव शहर पोलीस स्टेशन १ व शनिपेठ पोलीस स्टेशन एक अशा प्रकारे त्याने शहरातून १५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून त्याने चोरलेल्या सर्व दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Web Title: Two-wheeler thief transparency Transparency in theft work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.