तरसोद फाट्यानजीक कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:28 PM2018-11-26T12:28:52+5:302018-11-26T12:29:13+5:30
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात विजय किल्लेदार (४४, ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात विजय किल्लेदार (४४, रा. जामनेर रोड, भुसावळ) हे जखमी झाला.हा अपघात रविवारी दुपारी तरसोद फाट्यानजीक झाला. जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय किल्लेदार हे जळगावकडून घरी भुसावळकडे दुचाकीने जात असताना समोरुन येणाºया कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात किल्लेदार यांच्या डोक्याला दुखापत झाली. यादरम्यान किल्लेदार यांच्या घरानजीकच राहणारे लीलाधर पाचपांडे हे भुसावळकडे जात होते. त्यांनी किल्लेदार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. सदर कारचा क्रमांक एम.एच. १९, बीजे - ३३३३ असा असल्याची माहिती पाचपांडे यांनी दिली.