जळगावात महामार्गावर अजिंठा चौकात ट्रकच्या धडकेत पुन्हा दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:35 PM2017-12-04T12:35:01+5:302017-12-04T12:39:03+5:30

भरधाव ट्रकने सहायक फौजदाराला चिरडल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी साडे सहा वाजता पुन्हा अजिंठा चौकातच ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ट्रकचा मागून धक्का लागल्याने दुचाकीवर मागे बसलेले सत्ती श्रीनिवास सत्यनारायण रेड्डी (वय ४० रा.श्रीनगर, भुसावळ मुळ रा.विजयवाडा, आंध्रप्रदेश) कोसळले व त्यात ट्रकचे टायर डोक्यावरुन गेल्याने ते जागीच गतप्राण झाले. या व्यतिरिक्त दोन जण किरकोळ जखमी झाले.

Two wheelers killed in Ajanta Chowk on Jalgaon Highway | जळगावात महामार्गावर अजिंठा चौकात ट्रकच्या धडकेत पुन्हा दुचाकीस्वार ठार

जळगावात महामार्गावर अजिंठा चौकात ट्रकच्या धडकेत पुन्हा दुचाकीस्वार ठार

Next
ठळक मुद्देआठवडाभरातील दुसरी घटना दोन जण जखमीलग्नाला येत होते दुचाकीने

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,४: भरधाव ट्रकने सहायक फौजदाराला चिरडल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी साडे सहा वाजता पुन्हा अजिंठा चौकातच ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ट्रकचा मागून धक्का लागल्याने दुचाकीवर मागे बसलेले सत्ती श्रीनिवास सत्यनारायण रेड्डी (वय ४० रा.श्रीनगर, भुसावळ मुळ रा.विजयवाडा, आंध्रप्रदेश) कोसळले व त्यात ट्रकचे टायर डोक्यावरुन गेल्याने ते जागीच गतप्राण झाले. या व्यतिरिक्त दोन जण किरकोळ जखमी झाले.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सत्ती श्रीनिवास सत्यनारायण रेड्डी, अनिल संजय सय्या एटाकल्ली (वय ३२) व आदी सुरय्या रेड्डी (वय ३५) तिन्ही रा.श्रीनगर, भुसावळ मुळ रा.विजयवाडा, आंध्रप्रदेश हे दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एम.१२९३) सोमवारी सकाळी लग्नासाठी जळगावात येत होते. अजिंठा चौकात नेरी नाक्याकडे वळण घेत असताना भुसावळकडूनच मागून आलेल्या ट्रकचा (क्र.जी.जे.०३ बी.टी.९३३५) दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे मागे बसलेला सत्ती हा खाली पडला व त्याचवेळी ट्रकचे टायर त्याच्या डोक्यावरुन गेले. या घटनेत सत्तीचा जागीच मृत्यू झाला. आदी हा दुचाकी चालवत होता तर अनिल मध्ये बसलेला होता. यात दोघंही किरकोळ जखमी झाले.

Web Title: Two wheelers killed in Ajanta Chowk on Jalgaon Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.