१६ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराने लांबविल्या दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 09:27 PM2020-10-21T21:27:16+5:302020-10-21T21:28:34+5:30

संशयितास अटक : चोरी, विनयभंग व दारुचे गुन्हे

Two-wheelers lengthened by a criminal with 16 charges | १६ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराने लांबविल्या दुचाकी

१६ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराने लांबविल्या दुचाकी

Next

जळगाव : चोरी, विनयभंग व दारुचे तब्बल १६ गुन्हे दाखल असलेल्या संतोष रघुनाथ चौधरी (वय २७, रा. हतनुर, ता. भुसावळ) याने जळगावातून दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. त्याला बुधवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून महागड्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

एमआयडीसी परिसरातील काशिनाथ चौकातील एका हॉटेलात जेवणासाठी गेलेल्या अजय शालीक ब्राम्हणे (वय २७, रा. कौतीकनगर) या तरुणाची दुचाकी (क्र.एमएच १९ बी ५५८६) १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता काशिनाथ हॉटलेच्या बाहेरून चोरी झाली होती.या प्रकरणी ब्राम्हणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात संतोष रघुनाथ चौधरी याला अटक केली. संतोष याने गुन्ह्याची कबुली दिली. परंतू, त्याच्याकडे ब्राम्हणे यांच्या दुचाकी ऐवजी एमएच १९ एडब्ल्यू ६६०० क्रमांकाची दुसरी दुचाकी मिळुन आली आहे. ही दुचाकी देखील त्याने चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, संतोष याच्याविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात अवैध मद्यविक्री, चोरी, विनयभंग या सारखे एकुण १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपार देखील करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलींद सोनवणे, हेमंत कळसकर, विजय बावस्कर, चंद्राकांत पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, होमगार्ड विजय कोळी व प्रशांत पाटील यांच्या पथकाने संतोष याला अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता २३ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी काम पाहिले.

Web Title: Two-wheelers lengthened by a criminal with 16 charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.