जळगाव जिल्ह्यात रानडुकराच्या हल्ल्यात दोन महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 03:31 PM2018-02-11T15:31:23+5:302018-02-11T15:34:42+5:30
शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या रमाबाई गणपत सोनवणे (वय ४५ ) व बेबाबाई गजानन साळुंखे (वय ३६ ) दोन्ही रा.बौध्दवाडा, ममुराबाद, ता.जळगाव या दोन्ही महिलांवर रानडुकराच्या कळपाने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता खेडी शिवारात घडली.
ठळक मुद्देममुराबाद येथे शेतात कापूस वेचताना झाला हल्ला दोन्ही जखमी महिला जिल्हा रुग्णालयातमहिला व शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,११ :शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या रमाबाई गणपत सोनवणे (वय ४५ ) व बेबाबाई गजानन साळुंखे (वय ३६ ) दोन्ही रा.बौध्दवाडा, ममुराबाद, ता.जळगाव या दोन्ही महिलांवर रानडुकराच्या कळपाने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता खेडी शिवारात घडली. डिगंबर एकनाथ चौधरी यांच्या खेडी शिवारातील शेतात मजुराद्वारे कापूस वेचणीचे काम सुरु होते. रमाबाई व बेबाबाई या दोन्ही महिलांच्या दिशेन पाच ते सहा रानडुकरांचा कळप चालुन आला. त्यांच्यापासून बचाव करीत असताना या कळपाने या महिलांवर हल्ला चढविला. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.