आजारी बहिणीला भेटून परतणाऱ्या भावासह दोन तरुण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 01:18 AM2018-08-13T01:18:33+5:302018-08-13T01:19:36+5:30
आजारी बहिणीला भेटून किनवाडा, ता. मोताळा येथे परतणारा भाऊ व त्याचा मित्र दुचाकी अपघातात ठार झाले तिसरा जखमी झाला. ही घटना जामनेरनजीक रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
जळगाव - आजारी बहिणीला भेटून किनवाडा, ता. मोताळा येथे परतणारा भाऊ व त्याचा मित्र दुचाकी अपघातात ठार झाले तिसरा जखमी झाला. ही घटना जामनेरनजीक रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
सचिन अशोक सातव (२०) व स्वप्नील दिवाकर वैराळकर (१८) अशी या ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. यात गणेश गोपीनाथ वैराळकर हा जखमी झाला आहे. हे तिघेही जण हे दुचाकीने (क्र. एम.एच. २८, एएच ०१३४) रविवारी जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल सचिनच्या बहिणीस भेटायला आले होते. तिथून तिघे जण जळांद्री- फत्तेपुरमार्गे किनवाडाकडे जात होते. त्याचवेळी त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यात सचिन हा जागीच ठार झाला. ग्रामस्थांनी स्वप्नील व गणेश यांना फत्तेपूर आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. तिथे स्वप्नीलचा मृत्यू झाला. जखमी गणेश यास बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.