मागून पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाय घसरुन दोन तरुण बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:31 PM2020-07-20T12:31:15+5:302020-07-20T12:33:32+5:30

कांताई बंधाऱ्यातील दुपारचा थरार : एक जण बेपत्ता, दुसरा बचावला

Two youths drowned when their feet slipped due to the rising water | मागून पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाय घसरुन दोन तरुण बुडाले

मागून पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाय घसरुन दोन तरुण बुडाले

Next

जळगाव : रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मित्रांसोबत धानोरा शिवारातील कांताई बंधाºयात पोहायला गेलेले चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, आसोदा रोड) व सागर बाळू पाटील (२७, कांचन नगर) पाण्यात बुडाले. त्यात सागर याला वाचविण्यात यश आले तर चेतन हा पाण्यात वाहून गेला. रात्री ८ वाजेपर्यंत शोध मोहीम राबवूनही तो हाती लागला नाही. त्यामुळे शोध कार्य थांबविण्यात आले. रविवारीदुपारी साडे तीन वाजता ही घटना घडली. मागून पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन जण पाण्याच पडल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टी असल्याने कांचन नगरातील पाच तरुण धानोरा, ता.जळगाव शिवारातील कांताई बंधाºयात पोहण्यासाठी गेले होते. दुपारी साडे तीन वाजता बंधाºयाच्या काठावर असताना पाण्याच्या प्रवाहाने पाय निसटला आणि त्यात चेतन व सागर दोघंही वाहिले.
हा सागर याने आरडाओरड केल्याने इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तसेच गावातील काही लोकांनी धाव घेतली असता सागर हाताशी लागला तर चेतन सापडलाच नाही.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश चव्हाण, सतीश हळणोर व विलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. धानोरा, मोहाडी, नागझिरी येथील पट्टीच्या पोहणाºया तरुणांना पाचारण करण्यात आले.
रात्री आठ वाजेपर्यंत शोध
या तरुणांनी चेतनचा पाण्यात शोध घेतला. रात्री आठ वाजेपर्यंत शोध कार्य चालले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी मोहीम थांबविण्यात आली.
या घटनेने कांचन नगर व श्रीराम नगरमध्ये खळबळ उडाली असून सर्वजण चिंतीत आहेत.

पावसामुळे ओसांडून वाहतोय बंधारा
पावसाचे दिवस असल्याने बंधारा ओसांडून वाहत आहे. धबाधब्यासारखे दृष्य असल्याने चेतन व सागर बंधाºयाच्या काठावर गेले होते. मागून पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने त्यात त्याचा पाय घसरला. शेवाळमुळेही पाय घसरल्याची शक्यता वर्तविली जात आहे.पोलीस पाटील पूनम सोनवणे, देवराम सोनवणे, तलाठी सारीका दुर्मळ आदींनी देखील वेगवेगळ्या ठिकाणचे पोहणारे बोलावले.

चार बहिणींचा एकुलता भाऊ
चेतनच्या मित्र परिवाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतनच्या पश्चात आई मंदाबाई , वडील अरुण रंगनाथ वडील, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यापैकी एक बहिण वकिल असून पुण्याला तर दोन बहिणी मुंबई आहेत. एक जळगाव शहरातच वास्तव्यास आहे. चार बहिणींचा चेतन हा एकुलता भाऊ आहे. चेतनचे वडील अरुण पाथरवट हे बांधकाम मजुर आहेत. चेतन हा रेडीमेड कपडे विक्री करुन वडीलांना मदत करायचा. गेल्या काही दिवसांपूर्वीच तो महाराष्ट्र बँकेत कंत्राटी पध्दतीने शिपाई म्हणून रुजू झाला होता. कुटुंबाचा आधार तसेच एकुलता मुलगा बेपत्ता झाल्याने पाथरवट कुटुंबियांना धक्का बसला आहे.
 

Web Title: Two youths drowned when their feet slipped due to the rising water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.