जळगावात 'चंदीगड करे आशिकी'तील प्रकार; तृतीयपंथीने महिला असल्याचे सांगत केला विवाह  

By Ajay.patil | Published: July 5, 2023 07:47 PM2023-07-05T19:47:04+5:302023-07-05T19:47:19+5:30

या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महिला असल्याची बतावणी करणाऱ्या तृतीयपंथीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Type in Chandigarh Kare Aashiqui in Jalgaon transgenderclaimed to be a woman and married | जळगावात 'चंदीगड करे आशिकी'तील प्रकार; तृतीयपंथीने महिला असल्याचे सांगत केला विवाह  

जळगावात 'चंदीगड करे आशिकी'तील प्रकार; तृतीयपंथीने महिला असल्याचे सांगत केला विवाह  

googlenewsNext

जळगाव - गेल्या वर्षी प्रदर्शीत झालेल्या आयुष्यमान खुराणा व वाणी कपूर यांच्या ‘चंदीगड करे आशिकी’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. आता या चित्रपटासारखाच एक प्रकार जळगावात देखील झाला असून, एका तृतीयपंथीने महिला असल्याचे सांगत, एका युवकाशी लग्न करून त्या युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महिला असल्याची बतावणी करणाऱ्या तृतीयपंथीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील गिरणा पंपीगरोड परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय युवकाची फेसबूकवरून एका युवतीशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीपाळखी झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात म्हणजेच २९ एप्रिल २०२३ रोजी त्या युवकाशी लग्न केले. काही दिवसात हळूहळू त्या युवतीच्या हालचाली वेगळ्या वाटल्याने युवकाला स्पर्श न करू देत असल्याने, युवकाची शंका वाढत गेली. त्यानंतर लग्नाच्या काही दिवसानंतर डॉक्टराकडे तपासणीला घेवून गेले असता तृतीयपंथीयाचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महिला असल्याचे बनाव करणाऱ्या तृतीयपंथीने युवकाकडे १० लाखांची मागणी केल्यामुळे युवकाने पोलीस अधीक्षक व रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तसेच न्यायालयात देखील याचिका दाखल केली. या प्रकरणी कामकाज होवून, न्यायालयाने आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी युवकाकडून ॲड.केदार भुसारी यांनी न्यायालयात बाजू मांडली.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या नावाने अकांऊट
सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर त्या युवतीने आई-वडिल अपघातात वारले असल्याचे सांगितले. तसेच लग्नात देखील कोणत्याही नातेवाईकाला न बोलविण्याचे सांगितले होते. त्यामुळे लग्नात केवळ युवकाचे ठराविक नातेवाईक उपस्थित होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तृतीयपंथीने एका ॲपवर व सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या नावाने अकांऊट उघडले असल्याचे लक्षात आले. यामध्ये अनामिका, सोनू, दिव्या, सोनल या नावांचा समावेश होता. दरम्यान, संबधित तृतीयपंथीने जळगाव शहरातील एका रुग्णालयातून सर्जरी केल्याचाही प्रकार नंतर उघडकीस आला. आता न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फसवणूक करणाऱ्या त्या तृतीयपंथीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Web Title: Type in Chandigarh Kare Aashiqui in Jalgaon transgenderclaimed to be a woman and married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.