मुक्ताईनगर आता मुक्त झाले; कशापासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक, उद्धव ठाकरेंचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 05:18 PM2020-02-15T17:18:13+5:302020-02-15T18:21:10+5:30

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत.

Uddhav Thackeray attack on Eknath Khadase in Muktainagar | मुक्ताईनगर आता मुक्त झाले; कशापासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक, उद्धव ठाकरेंचा टोला 

मुक्ताईनगर आता मुक्त झाले; कशापासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक, उद्धव ठाकरेंचा टोला 

Next

मुक्ताईनगर (जळगाव) - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुक्ताईनगर येथे उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते एकनाथ खडसे यांना नाव न घेता टोला लगावला आहे. मुक्ताईनगर आज मुक्त झाले आहे. कशापासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक आहे, असे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांचे नाव न घेता म्हटले आहे. 

दरम्यान, आपण मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी का स्वीकारली याचाही उलगडा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ''उद्धव हे तू करणार नसशील तर हे होणारच नाही असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली. २५ वर्ष ज्यांच्या सोबत होतो.  त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला.''

२ लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारचा पहिला मोठा निर्णय ही माझ्या कारकिर्दीची सुरुवात होती. आता २ लाखाच्यावर कर्ज आणि नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच निर्णय घेणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 
 - मुक्ताईनगर आज मुक्त झाले कशा पासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक आहे
- उद्धव हे तू करणार नसेल तर हे होणारच नाही असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली
-  २५ वर्ष ज्यांच्या सोबत होतो त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला
- आता २ लाखाच्यावर कर्ज आणि नियमितपणे कर्ज फेडणा-यांसाठी लवकरच निर्णय घेणार
- ऑपरेशन लोटस ने तुम्हाला लोटलं आता सरकार पडण्याची हिम्मत दाखवून पाहा
-  शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातुन मुक्त करीत शेतात दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे वचन देतो
-   प्रशासन मला कळत नाही अशी विरोधक टिका करतात. त्याचा फार फरक पडत नाही. जनतेची काम झाली आणि होत आहे हे महत्त्वाचे

Web Title: Uddhav Thackeray attack on Eknath Khadase in Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.