प्रा.रत्नामाल बेंद्रे यांना युजीसी-बीएसआर मीड करिअर अ‍ॅवार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:41 PM2019-10-24T12:41:26+5:302019-10-24T13:21:13+5:30

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केमिकल सायन्सेस प्रशाळेतील पेस्टीसाईड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रोकेमिकल विभागप्रमुख प्रा. रत्नमाला सुभाष बेंद्रे ...

UGC-BSR Mid Career Award to Prof. Ratnamala Bendre | प्रा.रत्नामाल बेंद्रे यांना युजीसी-बीएसआर मीड करिअर अ‍ॅवार्ड

प्रा.रत्नामाल बेंद्रे यांना युजीसी-बीएसआर मीड करिअर अ‍ॅवार्ड

Next

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केमिकल सायन्सेस प्रशाळेतील पेस्टीसाईड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रोकेमिकल विभागप्रमुख प्रा. रत्नमाला सुभाष बेंद्रे यांना विद्यापीठ अनुदान आयोगाचा सन 2019-20 चा युजीसी-बीएसआर मीड करिअर अ‍ॅवार्ड जाहिर झाला आहे.
सदर पुरस्काराप्रित्यर्थ विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्रा.रत्नमाला बेंद्रे यांना संशोधनासाठी रु.10 लाख निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे त्यापौकी 8 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या पुरस्कार निधीतून कॅन्सरवरील उपचारात सध्या वापरल्या जाणाज्या औषधात प्लॅटीनम ऐवजी सोन्याचा वापर करुन औषधे तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
सदर पुरस्काराचे मानकरी ठरण्यासाठी युजीसीेने 15 संशोधकांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन, 5 संशोधन प्रकल्प पूर्ण करणे आणि उत्कृष्ट शोधनिबंध असे निकष लावले आहेत. हे निकष पूर्ण करीत असल्यामुळे प्रा.रत्नमाला बेंद्रे यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार मिळवणाज्या प्रा.बेंद्र हया विद्यापीठ परिक्षेत्रातील पहिल्या महिला प्राध्यापक आहेत.

 

Web Title: UGC-BSR Mid Career Award to Prof. Ratnamala Bendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.