तोंडापूर धरणातील पाण्याचा अखेर विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 03:36 PM2019-08-26T15:36:13+5:302019-08-26T15:36:39+5:30

काही गावांना लाभ : वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग

Ultrasonic erosion of the water in the mouth | तोंडापूर धरणातील पाण्याचा अखेर विसर्ग

तोंडापूर धरणातील पाण्याचा अखेर विसर्ग

Next


तोंडापूर, ता.जामनेर : तोंडापूर धरण भरल्यानंतर या धरणातील नदीत वाहून जाणारे पाणी कालव्यांमध्ये सोडल्याने अनेक गावांना याचा लाभ झाला आहे.
यंदा डोंगराळ भागातील दमदार पावसाने तोंडापूर येथील मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने सांडव्यातून लाखो लीटर पाणी नदीतून जात होते. हे वाया जाणारे पाणी ढालगांव, देव्हारी, वडगावसद्दो लघुपाट बंधाºयात सोडण्यात यावे यासाठी ‘लोकम’तने वेळोवेळी पाठपूरावा केल्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वेळीच लक्ष देऊन अखेर धरणाच्या कालव्या मार्फत हे पाणी प्रथम ढालगांव साठवण तलावात सोडयातआले. त्यामुळे वडगावसद्दो, देव्हारी धरणाची पाणी पातळी वाढून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या नाला खोलीकरणातील नालेही पुर्ण भरुन वाहत आहेत. तसेच वाकडी येथील साठवण तलावातही पाणी पोहचून वाकडी सह परीसरातील मांडवे, ढालगांव, ढालसिंगी, वडगाव येथील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे, तर शेतकरीवर्गही आनंदी असुन शेतकऱ्यांच्या विहिरीची पाणी पातळी वाढणार आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्या रजनी चव्हाण, संजु पाटील, ढालगांव ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले. लोकमतने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने परीसरातील शेतकरी विलास पाटील, श्रावणी पाटील, सतीष बिºहाडे, जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर साबळे, नंदु पाटील, विकास पाटील, संभाजी गोतमारे यांनी लोकमतचे आभार मानले.

Web Title: Ultrasonic erosion of the water in the mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.