चाळीसगावला रंगली ‘उमंग साम्राज्ञी’ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:48 PM2018-08-12T15:48:19+5:302018-08-12T15:51:00+5:30
मनीषा बोरसे ठरल्या ‘साम्राज्ञी’ : महिलांनी केले कलागुणांचे सादरीकरण
चाळीसगाव, जि.जळगाव : विविध कलागुणांचे सादरीकरण करुन मनीषा बोरसे यांनी ‘उमंग साम्राज्ञी’ हा सन्मान पटकाविला. स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध कलागुणांचे सादरीकरण पाहून परीक्षकांनी ही निवड जाहीर केली.
वेळी उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा संपदा उन्मेष पाटील यांच्यासह पं.स.सभापती स्मितल बोरसे, अध्यक्षा सुवर्णा राजपूत, सचिव नीता पाटील, समन्वयिका विजया पाटील, रेखा, मोहिनी लोहार, दिव्यांग महिला परिवाराच्या प्रमुख मीनाक्षी निकम, नाट्यकर्मी सुनीता घाटे, मेघा बक्षी, स्मितल बोरसे, डॉ. मीनाक्षी करंबळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या वतीने यंदा प्रथमच ‘उमंग साम्राज्ञी २०१८’ ही स्पर्धा राबविण्यात आली. यात उत्स्फूर्तपणे महिलांनी आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले. स्पर्धेत प्रथम फेरीत स्व ओळख यांची झाली. दुसऱ्या फेरीत कला सादरीकरण केले. तिसरी फेरीत आत्मविश्वासपूर्ण चालणे तर चौथ्या व पाचव्या फेरीत कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक योगदान सामान्य ज्ञान या गुणांवर आधारित प्रश्नोत्तर फेरी झाली.
उमंग सम्राज्ञी प्रथम फेरीत सहभागी स्पर्धकांनी स्वताचा परिचय विविध प्रकारे केला काही स्पर्धकांनी उखाणे, कविता, चारोळी, गाण्याच्या प्रकारात केला. दुसरी फेरीत स्पर्धकांनी विविध कला सादर केल्या योगिता खैरनार यांनी घुमर नृत्य सादर केले. डॉ.नीता निकुंभ यांनी गाणे, वर्षा अहिरराव नृत्य, शैला राजपूत यांनी देशभक्तीपर गाणे म्हटले. रूचा अमृतकर यांनी नाट्यछटा सादर केली. हर्षा जैन यांनी चित्रकलेच्या मध्यम सादर केली. साधना निकम यांनी कौटुंबिक संवाद नाट्यछटा, मनीषा मालपुरे भारुड, प्रमिला जोशी भजन, पूजा जोशी चित्रकला, वर्षा अग्रवाल डान्स, नीलिमा सैतवाल डान्स, सुनीता बोरा नाट्य छटा, योगिता बंग नाट्य छटा, मनीषा बोरसे एकांकिका, योजना पाटील डान्स, अर्चना चौधरी गाणे, शैलेजा पाटील गवळण, डॉ. रुपाली निकुंभ लावणी, उषा राजपूत भजन, माधुरी बोरसे गवळण अशा विविध प्रकारे कला सादर केल्या.
चौथ्या फेरीत १० स्पर्धकांना कमीत कमी वेळात प्रश्नाचे उत्तर देईल यातून पाचव्या फेरीला सात स्पर्धकांची निवड झाली. यातून ‘उमंग चाळीसगाव सम्राज्ञी २०१८ फर्स्ट रनर अप’ मनीषा बोरसे यांची निवड झाली. त्यांचा महाराष्ट्राची ओळख पैठणी व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
परीक्षक म्हणून मीनाक्षी निकम, मेघा बक्षी, सुनीता घाटे, सुवर्णा राजपूत, नीता चव्हाण यांनी काम पाहिले. सेकंड रनरअप योगिता बंग यांना पैठणी व सन्मान चिन्ह देण्यात आले. थर्ड रनरअप डॉ. रुपाली निकुंभ यांना पैठणी व सन्मान चिन्ह देण्यात आले.
मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नीता चव्हाण यांनी केले.