उमविला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 09:23 PM2018-08-11T21:23:24+5:302018-08-11T21:28:36+5:30
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव आजपासून देण्यात आले अन् खान्देशवासीयांचे गेल्या २५ वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले.
जळगाव : उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव आजपासून देण्यात आले अन् खान्देशवासीयांचे गेल्या २५ वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा झाल्याची घोषणा कुलगुरु प्रा.पी.पी. पाटील यांनी आज सकाळी विद्यापीठातील सिनेट सभागृहात झालेल्या बैठकीत केली.
शनिवारी सिनेट सभागृहात विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक कुलगुरु प्रा.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रारंभी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना कुलगुरुंनी आजपासून विद्यापीठाचा नामविस्तार होत असल्याचे जाहीर केले. हा दिवस विद्यापीठाच्या दृष्टीकोनातून अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा असल्याचे त्यांनी सांगितले.