राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत उमेश, मितालीने पटकाविले प्रथम पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:22+5:302021-05-24T04:15:22+5:30
२४ सीटीआर १९ व २० लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व ब्रम्हपुरी शासकीय तंत्रनिकेतन यांच्या ...
२४ सीटीआर १९ व २०
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व ब्रम्हपुरी शासकीय तंत्रनिकेतन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत जळगाव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामधील उमेश बोरसे व मिताली टोके यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.
वॉटरशेड डेलिनेशन ऑफ तापी रिव्हर बेसिन युजिंग क्यूजीएस या विषयावर उमेश व मिताली यांनी पेपर प्रेझेंटशन केले. त्यांना स्थापत्य विभागातील प्रा. रवींद्र कमोदकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम पारितोषिक म्हणून पंधरा हजार रुपयांचे बक्षीस दोन्ही विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच कराड शासकीय तंत्रनिकेतन आयोजित टेक्निकल क्विझ स्पर्धेत विशाल चौधरी याने प्रथम पारितोषिक मिळविले आहे. या यशाबद्दल विभागप्रमुख प्रा. संजय पगारे व प्राचार्य डॉ. एम. व्ही. इंगळे यांनी अभिनंदन केले आहे.