वाचनास असमर्थ, पण तरीही कळते पुस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:06 PM2019-04-28T12:06:08+5:302019-04-28T12:06:48+5:30
३ वर्षात जोडले लाखो वाचक
सागर दुबे
मी तुमचं लिखाण नेहमी ऐकते' असे ती सांगत होती. गमतीच्या स्वरात मी तिला म्हटले, 'मी वाचलेले ऐकतेस, मग तूच एखादं पुस्तक का वाचत नाहीस? तेव्हा तिने दिलेल्या उत्तराने मी अगदी स्तब्ध झालो. ती प्रज्ञाचक्षू होती. ज्यांना वाचनाची आवड आहे़ मात्र वाचनात जे असमर्थ आहेत, अशा लोकांपर्यंत आपण 'बुकलेट' या अॅपच्या माध्यमातून या डिजीटल युगात पुस्तक पोहोचवित आहोत, यातच खरे समाधान मिळाले, अशा भावना अॅपची निर्मिती करणारे अमृत देशमुख यांनीे 'लोकमत 'कडे व्यक्त केल्या, शहरातील नोबेल फाउंडेशनच्या एका कार्यक्रमानिमित्त अमृत देशमुख (मुंबई) हे नुकतेच जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़
अॅपचा प्रवास कसा सुरु झाला?
लहानपणापासून वाचनाची आवड असल्यामुळे आठवडयाला किमान एक तरी पुस्तक वाचायचो़ परंतु त्यात सातत्य कधीच राहिले नाही. मी चांगले शिक्षण घेतले आणि चार्टड अकाउंटंट झालो़ मात्र, तंत्रज्ञानाशी निगडित काहीतरी करावे असे वाटायचे. एके दिवशी मित्रासोबत चित्रपट पाहायला गेला असताना नुकतेच वाचलेल्या पुस्तकाविषयी मित्रांना सांगितले. त्याची सांगण्याची पध्दत पाहून मित्रांनी अशीच पुस्तके वाचून आमच्यासाठी त्यांचा छोट्या स्वरूपात सारांश व्हॉट्स अॅपवर पाठविण्याचे सुचविले. त्यानंतर बुकलेट अॅपचा प्रवास सुरू झाल्याचे अमृतने सांगितले़
प्रयोगाला प्रतिसाद कसा मिळाला?
सुरुवातीला आवडीच्या पुस्तकांचा सारांश त्याच्या मित्रमंडळीच्या व्हॉट्स अॅप गÑु्रपमध्ये पाठविण्यास सुरुवात केली. मात्र, चुकीचा वापर करीत असल्याच्या शंकेमुळे व्हॉटस्अॅपने माझे अकाउंट बंद केले़ मात्र, लोकांच्या प्रतिक्रीयेनंतर अकाउंट पुन्हा सुरू झाले़ परंतु पर्याय म्हणून पुस्तक दिली मी बुकलेट अॅपची निर्मिती केली़ लिखित आणि आॅडिया स्वरूपात पुस्तकांचे सारांक्ष टाकू लागलो़ वर्षभरात सुमारे २ लाख वाचन माझ्याशी जुळले़
१५० पुस्तकांचे सारांश
आतापर्यंत १५० पुस्तकांचे दोन-तीन हजार सारांशही फार कमी शब्दात लिहून व आॅडीओ बुकलेट अॅप टाकलेले आहेत. सुमारे दहा लाख लोक या अॅपवरील पुस्तक वाचत असल्याचे एका सर्वेक्षणात मला कळले़ तसेच बुकलेट वरूनच बुकलेट गाय हे नावाने ओळखले जाते
असे आहेत अमृत देशमुख
अमृत देशमुख. मुंबईचा एक तरुण. व्यवसायाने सी.ए. पण वाचनाची प्रचंड आवड. लहानपणीच पुस्तकांशी त्यांची गट्टी जमली, एकदा नुकताच वाचलेल्या पुस्तकाचा सारांश थोडक्यात मित्राला सांगितला. अन् तो सारांश मित्राला आवडला़ त्यातूनच अमृतला एक कल्पना सुचली. अन् मेक इंडिया रिड या मिशनचा शुभारंभ झाला.
पुस्तकांचे सारांश त्याने व्हॉटस्अॅपला शेअर करताच प्रतिसाद मिळाला़ त्यानंतर बुकलेट अॅपची निर्मिती झाली.
बुकलेट अॅपमुळे अनेकांना आपली वाचनाची आवड कायम ठेवता येत आहे़ सध्या बुकलेटवर फक्त इंग्लिश पुस्तकांचा सारांश पाठविला जात आहे़ परंतू, लवकरच काही वाचकांनीच घेतलेल्या पुढाकारामुळे हिंदी आणि मराठी पुस्तकेही वाचकांसाठी उपलब्ध होतील़ - अमृत देशमुख