एकजुटीने मिळाला विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 07:15 PM2019-10-24T19:15:28+5:302019-10-24T19:15:55+5:30

एरंडोल : चिमणरावांनी मिळविली भाजपचीही साथ

Unanimous victory | एकजुटीने मिळाला विजय

एकजुटीने मिळाला विजय

Next




एरंडोल : यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसह भाजप व मित्रपक्षांच्या पदाधिका-यांनी तसेच नेते मंडळींनी एक दिलाने काम केल्यामुळेच शिवसेनेचे उमेदवार चिमणराव पाटील यांना मोठ्या फरकाने विजय संपादन करणे शक्य झाले.
मतदारसंघात नेहमीच भाजप-सेनेमध्ये तू तू मै मै पाहायला मिळते. मात्र यावेळी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून निवडणुकीत यश कसे मिळेल, यासाठीच कंबर कसली होती. म्हणूनच राष्ट्रवादीचे मावळते आमदार डॉ.सतीष पाटील यांचा पराभव झाला असावा. चिमणराव पाटील यांची ओळख आजही सर्वसमावेशक, सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन चालणारा व सहकार क्षेत्रातील जाणकार नेता अशी आहे. कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसतानादेखील त्यांनी स्वत:च्या संघटन कौशल्यामुळे व बेरकी राजकारणामुळे युवा अवस्थेपासूनच राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला. मागील वेळी पराभूत झाल्यावरदेखील त्यांनी सातत्याने मतदारसंघातील मतदारांशी संपर्क वाढवून त्यांच्या सुखदु:खात सहभाग नोंदविला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी चाळीसगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना मतदारसंघातून मतांची मोठी आघाडी मिळवून दिली होती. याव्यतिरिक्त त्यांनी सदैव भाजप-सेनेची युती भक्कम कशी राहील यावर वेळोवेळी भर दिला. त्याचीच परिणती म्हणून आज मिळालेला विजय आहे, असे म्हणता येईल.
मावळते आमदार डॉ.सतीष पाटील यांच्या पाच वर्षांतील कार्याचा लेखाजोखा कसा आहे, याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी मतदारांपुढे मांडले. तसेच विकासकामांबाबत डॉ.सतीष पाटील यांची कार्यशैली कशी उदासीन आहे हे जनतेला पटवून देण्यात चिमणराव यशस्वी ठरले.

अपेक्षित वेळेपेक्षा दीड तास विलंब
एरंडेल मतदारसंघाचा अंतिम निकाल हाती येण्याची वेळ दुपारी २ वाजेपयर्यंतची होती. मात्र याउलट परिस्थिती पाहायला मिळाली. दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी विजयी उमेदवाराला निकालाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Web Title: Unanimous victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.