बिअरबारचे अनधिकृत बांधकाम तोडले
By admin | Published: January 14, 2017 12:42 AM2017-01-14T00:42:50+5:302017-01-14T00:42:50+5:30
शास्त्रीनगरात मनपाची कारवाई : जिल्हाधिकारी म्हणतात एकावरच कारवाई का?
जळगाव : रामानंदनगर रस्त्यावरील शास्त्रीनगरात रहिवासी भागात सुरू झालेल्या बिअरबार विरोधात नगरसेविकेने केलेल्या तक्रारीवरून मनपा अतिक्रमण विभागाने या हॉटेलचे मार्जीनस्पेसमधील शेडचे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई शुक्रवारी दुपारी केली. दरम्यान या हॉटेल मालक दाम्पत्याने जिल्हाधिका:यांकडे याआधीच याबाबत तक्रार केल्याने जिल्हाधिका:यांनी मनपा आयुक्तांना याच रस्त्यावर व परिसरात अन्य नागरिकांचेही अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण असताना त्यांच्यावर कारवाई का करीत नाही अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी या परिसरातील सर्व अतिक्रमण अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
रामानंदनगर रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांच्या बाजूच्या गल्लीतच शास्त्रीनगरात गट नं.105, प्लॉट नं. 28 येथील घरात रविंद्र जगताप व नयना जगताप या दाम्पत्याने वर्षभरापूर्वी हॉटेल सनराईझ नावाने बिअरबार सुरू केला आहे. रहिवासी क्षेत्रातही सर्व अटी-शर्ती पूर्ण करून हा बिअरबार सुरू करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान या बिअरबारबाबत मात्र नागरिकांच्या वाढत्या तक्रारी असून या परिसरातील नगरसेविका उज्जवला बेंडाळे यांनी या बिअरबार विरोधात मनपाकडे तक्रार केली आहे. तसेच बुधवारी सह्यांची मोहीमही राबविली. मनपा आयुक्तांनीही या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाची पाहणी केली होती. नगररचना विभागाच्या अधिका:यांनी मोजणी करून या हॉटेलचे अनधिकृत बांधकामाचे मोजमाप करून ते काढण्याची कारवाई अतिक्रमण विभागाच्या कर्मचा:यांच्या सहाय्याने शुक्रवारी सुरू केली. अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचा:यांनी ते शेडचे अनधिकृत बांधकाम तोडले. यावेळी जागा मालक जगताप व मनपा कर्मचा:यांमध्ये बाचाबाचीही झाली.
जिल्हाधिका:यांकडून विचारणा
कारवाईबाबत नोटीस मिळताच 9 रोजीच जगताप दाम्पत्याने जिल्हाधिका:यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यात नगरसेविका बेंडाळे व त्यांच्या पतीकडून विनाकारण त्रास दिला जात असल्याची तसेच अन्य नागरिकांचेही अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम असताना मनपा अधिका:यांना हाताशी धरून त्यांनाच त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. त्याची तातडीने दखल घेत जिल्हाधिका:यांनी मनपा आयुक्तांना याबाबत विचारणा केली होती. तसेच जगताप दाम्पत्याने दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिका:यांनी आयुक्तांना नियमानुसार सर्वाचे अतिक्रमण काढा, फक्त यांचेच अतिक्रमण कसे काढता? असा शेराही मारला.
18 अतिक्रमणांची यादी तयार
जिल्हाधिका:यांनी विचारणा केल्याने आयुक्तांनी तातडीने याबाबत आदेश दिले. त्यानुसार मनपाच्या अतिक्रमण विभागाचे अधीक्षक खान व नगररचना विभागाचे अभियंता समीर बोरोले यांनी या परिसरात सव्र्हे करून 18 अतिक्रमणांची यादीच तयार केली. त्यात गिरणा टाकी रोडवरील अनुभुती ऑटो, अंबर मेडिकल्स, सावलिया स्विट मार्ट, गणेश डेअरी, पंकज इलेक्ट्रीकल्स, स्वप्नदीप मेडिकल, तुळजाई इलेक्ट्रीकल्स, ओमसाई सूरज हेअर आर्ट, जोशी फ्रुट सेंटर, परमानंद भरित सेंटर, शास्त्री नगर प्लॉट नं.81 मधील लक्ष्मी ट्रेडर्स, तसेच जुने भगवान नगरातील प्लॉट नं.9मधील दुकान, पोस्टल कॉलनी प्लॉट नं. 10 व 20 मधील दुकान,भगवान नगरातील प्लॉट नं.58 मधील सत्यम प्रोव्हीजन, प्लॉट नं.40 मधील ओंकार निवास येथील दुकान, पोस्टल कॉलनी प्लॉट नं.2 मधील 2 दुकाने, लक्ष्मी वेल्डींग वर्क्स या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे. त्यांच्यावरही तातडीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.