नेर येथे 7 लाखांचा बेकादेशीर मद्य साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2017 03:09 PM2017-04-03T15:09:16+5:302017-04-03T15:09:16+5:30
धुळे तालुक्यातील नेर येथील हॉटेल शुभमवर रविवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी गोडावूनमधून 7 लाखांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आह़े
Next
हॉटेल शुभमवर कारवाई : एक ताब्यात
धुळे, दि.3-तालुक्यातील नेर येथील हॉटेल शुभमवर रविवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी गोडावूनमधून 7 लाखांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आह़े
धुळे तालुक्यातील नेर गावातील म्हसदी रोडलगत असलेल्या शुभम बिअरबार व परमिट रूम हॉटेलच्या बाजुला असलेल्या तळघरात तुषार जयस्वाल हा विनापरवाना देशी, विदेशी दारू व बिअरचा साठा ठेवून त्याची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली़ त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे यांना कारवाईचे आदेश दिल़े शिंदे यांच्या पथकाने 2 मार्च रोजी रात्री शुभम हॉटेलवर छापा टाकला़ हॉटेलच्या गोदामातून 7 लाख 6 हजार 407 रूपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. संशयीत तुषार भटूलाल जयस्वाल (वय 30 रा़ नेर) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
याठिकाणी उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक भामरे यांनी सीलबंद केलेल्या माला व्यतीरिक्त वरील दारूसाठा हॉटेलच्या बाजुला असलेल्या तळघरात गोडावूनमध्ये विनापरवाना, बेकायदेशीरित्या साठा मिळून आला़ पोलिसांनी तुषार जयस्वाल याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ही कारवाई पथकातील प्रदीप सोनवणे, पो़ना. बिपीन पाटील, पो़काँ मुकेश जाधव यांनी केली़