अनधिकृत पोस्टर लावण्या:या खाजगी क्लासेसविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2017 05:22 PM2017-04-04T17:22:36+5:302017-04-04T17:22:36+5:30
दुभाजक, कचराकुंडी तसेच रोहित्रांवर अनधिकृतपणे जाहिरातीचे पोस्टर चिटकविल्याप्रकरणी पेस क्लासेस् चालकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
Next
जळगाव,दि.4 - महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृतरित्या शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजक, कचराकुंडी तसेच रोहित्रांवर अनधिकृतपणे जाहिरातीचे पोस्टर चिटकविल्याप्रकरणी पेस क्लासेस् चालकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
महापालिकेतील अतिक्रमण विभागातील हाफिजअला खान, आतिश रतनलाल राणा, सलमान भिस्ती, संजय परदेशी, अरुण मोरे यांच्यासह कर्मचारी सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कारवाईसाठी निघाल़े पथकाला आकाशवाणी चौक, शिवाजी पुतळा ते ख्वॉजामियॉ चौक या रस्त्यांवर कचराकुंडी व रोहित्रांवर तसेच दुभाजकांवर पेस आयआयटी मेडिकल मॅथ सेट या क्लासेस्चे 15 जाहिरातीचे पोस्टर्स महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे लावलेले आढळून आल़े हाफिजअला खान यांच्या फिर्यादीवरून पेस क्लास चालकविरोधात जिल्हापेठ पोलिसात महाराष्ट्र विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा 1995 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह़े