गिरणा पात्रात अवैैध वाळू वाहतूक

By admin | Published: April 5, 2017 12:23 AM2017-04-05T00:23:01+5:302017-04-05T00:23:01+5:30

टाकरखेडा शिवार : लिलाव झालेला नसतानाही दिवसभरात शेकडो वाहनांतून होतोय उपसा

Unauthorized sand transport in the Girna area | गिरणा पात्रात अवैैध वाळू वाहतूक

गिरणा पात्रात अवैैध वाळू वाहतूक

Next

जळगाव : एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा शिवारातील गिरणा नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी लिलाव झालेला नसतानाही वाळूची सर्रास अवैैध वाहतूक सुरू असल्याची स्थिती आहे.
नदीपात्रातून वाळू वाहतूक करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे परवानगी देण्यात येते. परंतु टाकरखेडा येथे गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतुकीसाठी प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. असे असतानाही येथे वाळूची बिनदिक्कत वाहतूक सुरू आहे. 
सकाळी आठ वाजेपासून तर रात्री आठर्पयत दिवसभरात 80 ते 100 वाहनांमधून वाळूची सर्रास वाहतूक होत आहे. ट्रॅक्टर, ट्रक आणि डम्पर यासारख्या वाहनांमधून वाळूचा बिनधास्तपणे उपसा होत आहे. अवैैधपणे सुरू असलेल्या या वाळू वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
टाकरखेडा येथे वाळू उपशाचा लिलाव झालेला नाही. तेथे गिरणा नदीपात्रातून वाळूचे अवैैध उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या एक-दोन तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांची तत्काळ नियुक्ती करून या गैरप्रकाराला आळा घातला जाईल. वाळू चोरी करणा:यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
-सुनीता ज:हाड, तहसीलदार, एरंडोल
गेल्या महिनाभरापासून टाकरखेडा शिवारात गिरणा नदीपात्रातून वाळूची वाहतूक होत आहे. परवानगी नसतानाही वाहतूक होत असल्याबद्दल 10 मार्च रोजी एरंडोल येथे तहसीलदारांना अर्जाद्वारे कळविले आहे. परंतु कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सातत्याने होणा:या वाळू उपशामुळे गिरणा नदीपात्र खोल गेले असून, येत्या महिन्यात टाकरखेडावासीयांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. यासोबतच वैैजनाथसह परिसरातील गावांतही पाणीप्रश्न निर्माण होऊ शकतो.
-रामधन पाटील, सदस्य, ग्रामपंचायत, टाकरखेडा, ता. एरंडोल

Web Title: Unauthorized sand transport in the Girna area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.