वरखेडे धरणात काका-पुतण्याचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:27+5:302021-06-30T04:11:27+5:30
येथे गिरणा नदीवर असलेल्या वरखेडे बॅरेजमध्ये काका-पुतण्या अंघोळीसाठी गेले. पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार (१६) याने खोल पाण्यात उडी ...
येथे गिरणा नदीवर असलेल्या वरखेडे बॅरेजमध्ये काका-पुतण्या अंघोळीसाठी गेले. पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार (१६) याने खोल पाण्यात उडी मारली. तो पाण्यात बुडायला लागला. हे पाहून काका हिरतसिंग जगतसिंग पवार (४०) यांनी पुतण्याचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली; मात्र जास्त पोहता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना जवळच असलेल्या गावकऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढले व चाळीसगाव येथील देवरे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले; मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हिरतसिंग पवार हे पुणे येथे खासगी कंपनीत कार्यरत होते. ते दोन दिवसांपूर्वी गावात सहपरिवार आले होते. त्यांना मुलगा, मुलगी, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. इंद्रसिंग जगतसिंग पवार एसटी महामंडळ नंदुरबार येथे चालक म्हणून कार्यरत आहे. यांना दोन मुले होते. त्यात मृणाल मोठा होता. तो इयत्ता १० वीत नंदुरबार येथे शिक्षण घेत होता. ते परिवारासह गावी दोन दिवसांपूर्वी आले होते. या घटनेबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
===Photopath===
290621\29jal_2_29062021_12.jpg
===Caption===
काका-पुतण्या