काका, मी खूप शिकेन वडिलांचे स्वप्न पूर्ण करेन ! आमदारांनी स्वीकारले पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 10:56 PM2021-01-29T22:56:01+5:302021-01-29T22:57:19+5:30

नुकताच आमदारांनी वीर जवान अमित पाटील यांच्या कुटुंबियांना शैक्षणिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

Uncle, I will fulfill the dream of a very learned father! Guardianship accepted by MLAs | काका, मी खूप शिकेन वडिलांचे स्वप्न पूर्ण करेन ! आमदारांनी स्वीकारले पालकत्व

काका, मी खूप शिकेन वडिलांचे स्वप्न पूर्ण करेन ! आमदारांनी स्वीकारले पालकत्व

Next
ठळक मुद्देचाळीसगावच्या शहिद सुपुत्राच्या संकल्पाने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी या वर्षीचा शैक्षणिक फीसाठीचा धनादेश स्व.अमित पाटील यांच्या परिवारास सुपूर्द

चाळीसगाव : तो अवघा साडेपाच वर्षाचा...वडिलांच्या निधनाचे अश्रू अजूनही त्याच्या डोळ्यात दाटलेले... मात्र शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती... आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेला मदतीचा धनादेश हाती घेत तो म्हणाला, ‘काका, मी खूप शिकेन, वडिलांचे स्वप्न पूर्ण करेन...’ वाकडी येथील शहिद अमित पाटील यांचा सुपुत्र भूपेश याचे हे बोल ऐकून उपस्थित सर्वांचाच डोळ्यात पाणी आले. नुकताच आमदारांनी वीर जवान अमित पाटील यांच्या कुटुंबियांना शैक्षणिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. वाकडी येथील रहिवासी व सीमा सुरक्षा दलातील शहिद जवान अमित साहेबराव पाटील हे महिनाभरापूर्वी कर्तव्यावर असतांना वीरगतीस प्राप्त झाले. त्यांचा साडेपाच वर्षीय मुलगा चि.भूपेश अमित पाटील याचे शैक्षणिक पालकत्व चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वीकारत असल्याचे वचन दिले होते. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी आमदार चव्हाण यांनी या वर्षीचा शैक्षणिक फीसाठीचा धनादेश स्व.अमित पाटील यांच्या परिवारास सुपूर्द केला. फैजपूर येथील खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दीपाली चौधरी-झोपे यांनी शहिद जवान अमित पाटील यांच्या परीवारातील सदस्यांचा अपघात विमा उतरवला आहे. आमदारांच्या जनसेवा कार्यालयात विमा पॉलिसीचे पेपर शहिद जवान अमित पाटील यांच्या पती रेखा पाटील यांना देण्यात आले. यावेळी अमित पाटील यांचे वडील साहेबराव पाटील, आई सखुबाई पाटील, भाऊ योगेश पाटील उपस्थित होते. वीर जवान अमित पाटील यांच्या परिवाराच्या पाठीशी यापुढेही नेहमीच भक्कम उभे राहून प्रत्येक अडीअडचणीला साथ देऊ, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. यावेळी पं.स. माजी सभापती व विद्यमान गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, भाजप महिला आघाडी शहराध्यक्ष नगरसेविका संगीता गवळी, संदीप धर्मराज पाटील, राहुल पाटील, विकास गोसावी यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Uncle, I will fulfill the dream of a very learned father! Guardianship accepted by MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.