सरपंच पद रद्द करण्यासाठी अर्ज केला म्हणून मामा-भाच्याला मारहाण!

By सागर दुबे | Published: April 3, 2023 03:37 PM2023-04-03T15:37:41+5:302023-04-03T15:38:34+5:30

कानळदा येथील प्रकार; भाच्यावर चाकूने वार, सहा जणांविरूध्द गुन्हा

uncle nephew beaten up for applying for cancellation of sarpanch post | सरपंच पद रद्द करण्यासाठी अर्ज केला म्हणून मामा-भाच्याला मारहाण!

सरपंच पद रद्द करण्यासाठी अर्ज केला म्हणून मामा-भाच्याला मारहाण!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : कानळद्यातील पुंडलिक सपकाळे यांचे सरपंच पद रद्द होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केल्याच्या कारणावरून सहा जणांनी आनंदा दगडू सपकाळे व चेतन विजय साळूंखे (२५, दोन्ही रा. कानळदा) या मामा-भाच्याला मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कानळदा गावात घडली. दरम्यान, भाच्यावर एकाने चाकूने हल्ला केल्यामुळे तो जखमी झाला असून त्याच्या जबाबावरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

चेतन हा कानळदा येथे मामा आनंदा सपकाळे यांच्याकडे वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील सोसायटीजवळ सपकाळे यांचा काही लोकांशी वाद झाल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार त्यांनी भाचा चेतन याला फोनवर सांगून सोसायटीजवळ बोलवून घेतले. चेतन हा भांडण सोडवित असताना अचानक एकाने त्याच्या डाव्या हातावर चाकूने वार केला. तर इतर दोन जणांनी मानेवर विट मारून फेकली. यात तो जखमी झाला. त्यानंतर त्यास उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले.

त्यावेळी त्याला कानळद्यातील पुंडलिक सपकाळे यांचे सरपंच पद रद्द होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता, त्याचा राग येवून मारहाण करण्यात आल्याची माहिती मामा आनंदा सपकाळे यांनी दिली. त्यानंतर तालुका पोलिसांनी चेतन याचा जबाब नोंदविल्यानंतर मारहाण करणा-यांविरूध्द भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर हे करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: uncle nephew beaten up for applying for cancellation of sarpanch post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.