माझी वसुंधरा अभियानांतर्गत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:33+5:302021-02-06T04:27:33+5:30
(०६सीटीआर २८,२९,३०) नशिराबाद : येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायतीतर्फे गावात जनजागृती रॅली काढून मार्गदर्शन करण्यात आले व स्वच्छते बाबतची ...
(०६सीटीआर २८,२९,३०)
नशिराबाद : येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायतीतर्फे गावात जनजागृती रॅली काढून मार्गदर्शन करण्यात आले व स्वच्छते बाबतची शेकडो नागरिकांनी शपथ घेतली. याप्रसंगी कृषी विस्तार अधिकारी अर्जुन पाटोले कृषी अधिकारी प्रीती आहिरे, कृषी अधिकारी बडे,प् रवीण सोनवणे, प्राजक्ता सोनवणे, ग्राम विकास अधिकारी बी.एस.पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवर मंडळींनी ग्रामस्थांना माझी वसुंधरा अभियानाबाबत मार्गदर्शन जनजागृती करीत साफसफाई स्वच्छता आदींबाबतचे महत्व पटवून दिले. माझी वसुंधरा अभियानात शासकीय स्तरावर नशिराबाद ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या
पाच तत्त्वांचे म्हणजेच पृथ्वी वायू जल अग्नी आकाश या पंचमहाभूतांचे संवर्धन संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत नदी सफाई वृक्षलागवड प्लास्टिक निर्मूलन घंटागाडीद्वारे ओला व सुका कचरा साफसफाईचे कामकाज ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून करण्यात येत आहे गुरुवारी माझी वसुंधरा अभियानांतर्गत गावात जनजागृती रॅली काढून
नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ यांनी स्वच्छतेबाबत शपथ घेऊन अभियान यशस्वी करण्याबाबत निर्धार व्यक्त केला याप्रसंगी सुमारे अडीचशे ते तीनशे नागरिक उपस्थित होते.