पेसा कायद्याअंतर्गत

By admin | Published: September 11, 2015 09:27 PM2015-09-11T21:27:08+5:302015-09-11T21:27:08+5:30

जिल्ह्यात पेसा कायद्याअंतर्गत तलाठय़ांच्या 33 जागा भरण्यात येत असून त्यासाठी रविवार, 13 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे.

Under PESA Act | पेसा कायद्याअंतर्गत

पेसा कायद्याअंतर्गत

Next
दुरबार : जिल्ह्यात पेसा कायद्याअंतर्गत तलाठय़ांच्या 33 जागा भरण्यात येत असून त्यासाठी रविवार, 13 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे. दरम्यान, लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.जिल्ह्यात तलाठय़ांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्व जागा या आदिवासी भागातील आहेत. त्यामुळे पेसा कायद्याअंतर्गत 33 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी तब्बल सहा हजार 103 अर्ज प्राप्त झाले आहेत. शहरातील 17 ठिकाणी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रातील एका खोलीत 24 विद्याथ्र्याची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विद्याथ्र्याला एबीसीडीप्रमाणे वेगवेगळे संच दिले जाणार आहेत. यासंदर्भात एकूण भरती प्रक्रिया, परीक्षेसंदर्भातील माहिती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात सर्व संबंधित अधिकारी व कर्मचा:यांचे मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी टी.एम. बागुल, निवासी उपजिल्हाधिकारी नीलेश सागर यांच्यासह इतर अधिका:यांनी मार्गदर्शन केले. परीक्षा केंद्रलेखी परीक्षेसाठी नंदुरबारात 17 परीक्षा केंद्रांची सोय करण्यात आली आहे. त्यात मिशन इंग्लिश मीडियम स्कूल, मिशन मराठी शाळा, कमला नेहरू कन्या विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, पॉलिटेकिAक विद्यालय, श्रॉफ विद्यालय, जीटीपी महाविद्यालय, विधी महाविद्यालय, जिजामाता महाविद्यालय, पी.के.पाटील विद्यालय, यशवंत विद्यालय, बी.एड्. कॉलेज, डी.आर. विद्यालय, अभिनव विद्यालय, पातोंडा विद्यालय, एकलव्य विद्यालय या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. सकाळी आठ ते दुपारी चार वाजेर्पयत हे आदेश परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात राहणार आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरातील एस.टी.डी, फॅक्स, ङोरॉक्सची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. परीक्षार्थ्ीनी परीक्षा वेळेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Web Title: Under PESA Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.