जीएमसीतील ‘त्या’ विद्यार्थ्यांना अधिष्ठातांकडून समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:02+5:302021-09-25T04:16:02+5:30

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विद्यार्थ्यांचा एक ग्रुप अजिंठा लेणी येथे सहलीसाठी गेल्यानंतर एक विद्यार्थी दरीत कोसळल्याची ...

Understanding from ‘superiors’ students at GMC | जीएमसीतील ‘त्या’ विद्यार्थ्यांना अधिष्ठातांकडून समज

जीएमसीतील ‘त्या’ विद्यार्थ्यांना अधिष्ठातांकडून समज

Next

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विद्यार्थ्यांचा एक ग्रुप अजिंठा लेणी येथे सहलीसाठी गेल्यानंतर एक विद्यार्थी दरीत कोसळल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडून अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी लेखी घेतले आहे.

गणेशोत्सवानंतर महाविद्यालयातील १२ विद्यार्थी व ११ विद्यार्थिनींचा एक ग्रुप या सहलीला गेलेला होता. १६ रोजी महाविद्यालय असताना कोणाला काहीही कल्पना न देता हे विद्यार्थी सहलीला गेल्याचे समजते. यात सेल्फी काढण्याच्या नादात एक २१ वर्षीय विद्यार्थी दरीत कोसळला होता. त्याला वाचविण्यात त्या ठिकाणी यश आले होते; मात्र या घटनेची गंभीर दखल घेत या विद्यार्थ्यांकडून पालकांसमोर लेखी लिहून घेण्यात आले आहे. पुढे अशी चूक झाल्यास गंभीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: Understanding from ‘superiors’ students at GMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.