धावती गाडी पकडणाऱ्या तरुणाला समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:17 AM2021-05-14T04:17:04+5:302021-05-14T04:17:04+5:30
अवजड साहित्यामुळे प्रवाशांची गैरसोय जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशन जवळ माल धक्क्याच्या परिसरात रेल्वेचे विविध लोखंडी साहित्य पडून असल्याने ...
अवजड साहित्यामुळे प्रवाशांची गैरसोय
जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशन जवळ माल धक्क्याच्या परिसरात रेल्वेचे विविध लोखंडी साहित्य पडून असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने हे साहित्य उचलण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
गोलाणी मार्केट मध्ये तरुणांची हुल्लडबाजी
जळगाव : शहरात एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन असतांना, शहरातील विविध भागातील मुले गोलाणी मार्केट मध्ये दुपारी एकत्र येऊन हुल्लडबाजी करत आहेत. यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी पोलिसांनी या हुल्लडबाज तरुणांवर कारवाईची मागणी होत आहे.
शेतकरी बांधवांनी ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव : शासनाने वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या कृषी पंप धारक शेतकऱ्यांसाठी थकीत विजबिलात ५० टक्के सवलत लागू केली आहे. तसेच थकबाकीवरील व्याज व विलंब आकारही माफ केला आहे. शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत या योजनेचा शेतकरी बांधवांना ३१ मार्च २०२२ पर्यंत लाभ घेता येणार आहे. तरी शेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घेऊन थकीत वीजबिल भरावे व कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना अल्प प्रतिसाद
जळगाव : एकीकडे मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी असतांना,दुसरीकडे जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना मात्र प्रवाशांची अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे नेहमी गर्दी असणाऱ्या कामायनी एक्स्प्रेस,पवन एक्स्प्रेस व महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांनाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या या गाड्यांचे बोटावर मोजण्या इतक्याच प्रवाशांकडून आरक्षण होत असल्याचे सांगण्यात आले.