भुसावळ येथे उपक्रम : ‘मद्य त्यागून दूध पिऊया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:32 AM2019-01-02T01:32:23+5:302019-01-02T01:33:56+5:30
मद्य त्यातून दूध पिऊया, असा संकल्प नववर्ष दिनी टाटा मॅजिक चालक-मालक संघटनेतर्फे करण्यात आला.
भुसावळ, जि.जळगाव : मद्य त्यातून दूध पिऊया, असा संकल्प नववर्ष दिनी टाटा मॅजिक चालक-मालक संघटनेतर्फे करण्यात आला.
‘नवीन वर्षी करुया संकल्प, मद्य त्यागून, आरोग्यदायी दूध पिऊन’ नवीन वर्षी तरुणांमध्ये व्यसनविरोधी जनजागृती, व्यापक चळवळ उभी राहावी, काबाडकष्ट करून कमावलेले दोन पैसे दारुच्या व्यसनामुळे घालवून संसाराची होणारी राखरांगोळी थांबावी याकरिता टाटा मॅजिक चालक-मालक संघटनेतर्फे नवीन संकल्प करण्यात आला आहे. यात व्यसनापासून मुक्ती मिळावी व तरुणांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता संघटनेतर्फे प्रत्येक वाहनांवर जनजागृतीपर बॅनर लावले जात आहेत, त्याचे उद्घाटन शहर वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक झाले यांच्या हस्ते करण्यात आले. नववर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करू या, असा संकल्पही करण्यात आला व दूध वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष दिनेश भंगाळे, सरचिटणीस चंद्रकांत चौधरी, प्रकाश कोळी, लक्ष्मण भोळे, विजय तायडे, फिरोज पटेल, मुन्ना मनोटिया, वसंत कोळी, दीपक काटे, भरत जोहरी, श्याम फुलगावकर, अमोल महाजन, सीमा चौधरी, वैशाली ठाकूर, सविता पाटील व युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.