४०० कर्मचाºयांवर बेरोजगारीची कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 12:40 AM2017-04-06T00:40:54+5:302017-04-06T00:40:54+5:30

दारू दुकाने बंदनंतरची स्थिती : दोन हजार लोकांवर उपासमारीची वेळ

Unemployment Hood for 400 employees | ४०० कर्मचाºयांवर बेरोजगारीची कुºहाड

४०० कर्मचाºयांवर बेरोजगारीची कुºहाड

googlenewsNext

भुसावळ : सर्वोच्च  न्यायालय आणि शासनातर्फे  १ एप्रिलपासून महामार्ग आणि राज्य मार्गाच्या ५०० मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करण्यात आली आहेत. दारू दुकाने बंद झाल्याने या दुकानांमध्ये विविध प्रकारची कामे करणाºया  ४०० मजुरांवर    बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. दरम्यान, अशा मजुरांच्या सुमारे दोन हजार  कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मजूर व त्यांचे कुटुंबीय हातावर हात देऊन बसल्याची स्थिती शहरात निर्माण झाली आहे.
भुसावळ येथील उद्योजक व किरकोळ दारू विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक नागराणी यांच्या मते शहरात ४० पेक्षा जास्त बिअरबार, देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने, हॉटेल आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी किमान दहा कामगार वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यासाठी नियुक्त आहेत. ती वर्षानुवर्षे हीच कामे करीत आहेत. रोज काम व रोज वेतन या पद्धतीने त्यांना ठेवण्यात आले आहे. आता दारू दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे या मजुरांचा रोजगार बुडाला आहे. या मजुरांची व त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे.  नेहमीच्या काही कामगारांना आर्थिक मदत करीत आहोत, मात्र अशी मदत किती दिवस करणार व त्यांनाही ते कसे परवडणार या परिस्थितीतून मार्ग निघणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.(प्रतिनिधी)
कामगारांना आर्थिक साह्य...
  भुसावळ शहरात सुमारे दारूची ४० दुकाने आहेत. या प्रत्येक दुकानात विविध प्रकारची कामे करण्यासाठी शेकडो मजूर आहेत. साधारण एका दुकानात दहा मजूर कामासाठी आहेत. गेल्या १ एप्रिलपासून दारू दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे या मजुरांची व त्यांच्यावर अवलंबून त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. रोज काम रोज पगार या तत्त्वावर मजूर काम करीत होते. आता काम नसल्याने ते बसून आहेत. काम नसताना आमच्याकडील मजुरांना आम्ही मदत करीत आहोत, मात्र किती दिवस मदत केली जाईल, अशी व्यथा जळगाव जिल्हा किरकोळ दारू विक्रेता संघाचे अध्यक्ष अशोक नागराणी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

Web Title: Unemployment Hood for 400 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.