रेल्वेखाली आल्याने ट्रॅकमनचा दुदैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:05 PM2018-05-29T13:05:01+5:302018-05-29T13:05:48+5:30
दोनगावात शोककळा
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ - रात्रपाळीत कर्तव्य बजावत असताना विजय कैलास पाटील (वय-३०, रा़ दोनगाव, ता़धरणगाव) या तरूणाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला़ ही घटना मलकापूर तालुक्यातील खुमगाव बुरटी स्टेशनजवळ सोमवारी पहाटे पाच वाजता घडली़ सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर दोनगाव येथे अंत्यसंस्कार झाले़
धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील तरुण विजय कैलास पाटील हे रेल्वेत ट्रॅकमन म्हणून नोकरीला होते़ रविवारी रात्री खुमगाव बुरटी स्टेशनजवळ ड्युटीवर असताना विजय हा धावत्या रेल्वेखाली आला़ त्यात त्याचे दोन्ही पाय कापले गेले अन् चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली़ त्यामुळे विजय याचा जागीच मृत्यू झाला़
रेल्वे पोलिसांनी त्वरीत विजय याच्या नातेवाईकांना कळविले़ नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली़ तर मृतदेह हा विजयचा असल्याची ओळख पटली़ शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ सोमवारी सायंकाळी विजय यांच्यावर दोनगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़
वर्षभरापूर्वीच झाले लग्न
विजय पाटील हा दीड वर्षापूर्र्वी रेल्वेत नोकरीला लागला होता़ नोकरीला लागल्या पासूनच तो खुमगाव बुरटी येथे कार्यरत होता़ दरम्यान, सासºयाकडून अधिक मासाचे आंमत्रण आल्याने तो रविवारी रात्री ड्युटी करुन सोमवारी सकाळी गरताड येथे जाणार होता़ वर्षभरापूर्वीच ८ मे २०१७ रोजी विजयचा गरताड येथील सखाराम त्र्यंबक पाटील यांच्या मुलीशी विवाह झाला होता. त्यांना दीड महिन्याची मुलगी आहे़
माजी सरपंचाचा मुलगा
मयत विजय हा अतिशय मनमिळावू स्वभावाचा होता़ विजय हा दोनगाव येथील माजी सरपंच कैलास भागवत पाटील व विद्यमान ग्रा़पं़सदस्या छायाबाई कैलास पाटील यांचा मुलगा होता़ तो तिघा भावंडामध्ये मोठा असून त्याच्या पश्चात एक बहिण, एक भाऊ असून बहिणीचे लग्न झाल आहे़ बहिण मुंबईला असते़ विजयच्या मृत्यूने संपूर्ण गाव सुन्न झाले होते़