रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पालिका प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:32+5:302021-07-12T04:11:32+5:30

चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नगरपालिका प्रशासनाविरोधात तहसील कचेरी येथे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून शहरातील ...

Unique agitation against municipal administration due to poor condition of roads | रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पालिका प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पालिका प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन

googlenewsNext

चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नगरपालिका प्रशासनाविरोधात तहसील कचेरी येथे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून शहरातील रस्त्यावर चालणे मुश्कील झाले आहे म्हणून गटनेते राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व शहर विकास आघाडीतर्फे रविवारी प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांभोवती रांगोळी काढून झाडे लावण्यात आली व शहरातून रॅली काढण्यात आली.

खरजई नाका ते दयानंद हॉटेलपर्यंत गेल्या वर्षी रस्ता करण्यात आला होता; परंतु एकाच वर्षात रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. सिग्नल पॉईंट ते कचेरीपर्यंतसुद्धा चालणे अवघड झाले आहे. या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. गेली चार वर्षे शहरातील नागरिक व व्यापारी हे सहन करीत आहेत. फक्त कागदावरच नगरपालिकेचा कारभार पाहावयास मिळतो आहे, आता तरी प्रशासनाला जाग येईल का? चाळीसगाव शहरातील रस्ते हे अतिशय खड्डेमय झालेले असताना सामान्य जनतेला मणक्याचे व पाठीचे त्रास चालू झाले असून, महिलांना तर वाहने चालविणे अतिशय कठीण झाले आहे. सिग्नल चौकपासून ते घाट रोड जाण्यासाठी अर्धा तास लागतोय. खड्ड्यांमुळे कायम ट्रॅफिक जाम असते. गणेश रोड, कॅप्टन कॉर्नर कचेरी अंधशाळा ते कचेरी ह्या रस्त्यावर चालणे अवघड झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व लोकनेते अनिलदादा देशमुख शहरविकास आघाडीतर्फे खड्ड्यांभोवती रांगोळी काढून झाडे लावण्यात आली व कचेरी ते सिग्नल व गणेश रोडवर रॅली काढण्यात आली.

यावेळी जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, रा. काँ. तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष सोनल साळुंखे, शहराध्यक्ष श्याम देशमुख, नगरसेवक भगवान पाटील, पं. स. सभापती अजय पाटील, मंगेश पाटील, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सदाशिव गवळी, जगदीश चौधरी, रवींद्र गिरधर चौधरी, प्रदीप राजपूत, प्रशांत पाटील, शेखर देशमुख, हरी जाधव, बाजीराव दौंड, परिघा आव्हाड, हेमांगी शर्मा, स्नेहल देशमुख, आर. के. माळी, खुशाल पाटील, भय्यासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रकाश पाटील, योगेश पाटील, मिलिंद शेलार, विजय शितोळे, जिल्हा प्रवक्ते आकाश पाटील, मोहित भोसले तालुकाध्यक्ष रा. यु. काँग्रेस, शुभम पवार शहराध्यक्ष रा. यु. काँग्रेस, गौरव पाटील शहराध्यक्ष रा. वि. काँग्रेस, सुजित पाटील, विलास पाटील, राकेश राखुंडे, आव्हाड, दिनेश महाजन, भय्यासाहेब महाजन, सौरभ त्रिभुवन, रिकी सोनार, गुंजन मोटे, शरदसिंग राजपूत, विनोद गवळी, कौस्तुभ राजपूत, पंजाबराव देशमुख, रफिक शेख, सूरज शर्मा, दीपक शिंदे, कुंतेश पाटील, प्रतीक पाटील, विकास बोंडारे, निखिल देशमुख, पप्पू राजपूत, मंगेश वाबळे, कुलदीप निकम, हृदय देशमुख, अतुल चौधरी, शुभम गवळे, घनश्याम जगताप, सिद्धार्थ देशमुख, आदी उपस्थित होते.

Web Title: Unique agitation against municipal administration due to poor condition of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.