चोपड्यात बेरोजगारांच्या अनोख्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:49+5:302021-06-20T04:13:49+5:30
चोपडा : राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा कार्यक्रम राबविण्यात आला. एन.एस.यू.आय.चे प्रदेश सचिव चेतन बाविस्कर यांच्या ...
चोपडा : राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा कार्यक्रम राबविण्यात आला. एन.एस.यू.आय.चे प्रदेश सचिव चेतन बाविस्कर यांच्या उपस्थितीत एन.एस.यू.आय व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पंतप्रधानांवर टीकात्मक अनोख्या मुलाखती घेतल्या.
"मेक इन इंडिया प्रस्तुत मन की बात बेरोजगाराची खराब हालात" हे स्वरूप ठेऊन मेक इन इंडिया प्रस्तुत मोदी बेरोजगार मेळावा भरवून आंदोलनस्थळी स्टॉल उभारून आणि नोकरीसाठी वेगवेगळ्या अटी ठेवल्या होत्या. मोदींचा सर्व सोशल मीडियाचा फॉलोअर असावा, मोदींचे भाषण पाठ असावे आदी अटी ही पात्रता असल्यास बेरोजगार मेळाव्यामध्ये मुलाखती घेण्यात येतील, असे पोस्टर लावून मुलाखती घेण्यात आल्या.
यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष के. डी. चौधरी, कांतीलाल सनेर, प्रदेश सचिव एन. एस. यू. आय. चेतन बाविस्कर, तापी सहकारी सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील, युवक कॉंग्रेस अध्यक्ष चोपडा विधानसभा किरण सोनवणे, देवकांत चौधरी, एन.एस.यू.आय.एस.आर. ओ. घनश्याम पाटील, शहराध्यक्ष हर्षवर्धन पवार, महाविद्यालय प्रमुख प्रेम पाटील, संजोग पाटील, सुमीत पाटील, हेमंत पाटील, जीवन बागुल, परेश पवार, गोविंद खजुरे, निखिल पाटील, मोसिम तडवी, प्रदीप नेरपगारे आदी उपस्थित होते.