गदीमांच्या कविता वाचून अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:31+5:302020-12-07T04:11:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाकवी ग. दि. माडगुळकर यांचे पुणे येथे स्मारकासाठी जळगावातील साहित्यिक व कलावंतांनी १४ डिसेंबर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाकवी ग. दि. माडगुळकर यांचे पुणे येथे स्मारकासाठी जळगावातील साहित्यिक व कलावंतांनी १४ डिसेंबर रोजी अनोखे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात घोषणा निदर्शने न करतात शांततेत गदीमा यांच्या कविता वाचन तसे गाणी गात हे आंदोलन करण्यात येार आहे.
गेल्या ४३ वर्षपासून स्मारकासाठी प्रयत्न सुरू असूनही राजकारण्यांनी ताकास तुर लागू दिले नाही, म्हणून आता या स्मारकासाठी जनआंदोलन छेडण्यात आल्याचे कलावंतांनी कळविले आहे. महाराष्ट्रसह सहा राज्ये तसेच परदेशातही आंदोलन केले जाणार आहे. कोरोनामुळे उपस्थितीवर मर्यादा असेल यावर तोडगा म्हणून प्रत्येक कलावंत एक कविता किंवा गाणे सादर करणार असून आंदोलनात कोणातही राजकीय पक्षक, संघटना साहित्यिक, नाट्य संस्था सहभागी असणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जळगाव येथे आयोजित केलेल्या या आंदोलनात कविता वाचन, गीत गायकन, चित्र रेखाटण होणार आहे. यात अशोक कोतवाल, शंभू पाटील, शिवाजीराव पाटील, माया धुप्पड, शशिकांत हिंगोणेकर, वा. ना. आंधळे, डॉ. संजिवकुमार सोनवणे, बी. एन. चौधरी, डॉ. नरसिंग परदेशी, अशोक सोनवणे, गिरीश कुळकर्णी, प्रा. राजेंद्र देशमुख, अशोक कोळी, निरंजन शेलार, विनोद ढगे, हेमंत पाटील, हर्षल पाटील, मीना सैंदाणे, डि.बी. महाजन, सतिष जैन, संजय सोनार, शैलेंद्र बिरारी, अ. फ. भालेराव, गो. शि. म्हसकर, प्रकाश पाटील, प्रविण लोहार हे साहित्यिक कलावंत सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजक साहेबराव पाटील यांनी दिली आहे.