केळी खोडापासून धागानिर्मितीचा राज्यातील अनोखा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 12:28 AM2017-02-17T00:28:32+5:302017-02-17T00:28:32+5:30

फैजपूर : ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अॅण्ड प्रॉडक्ट्स सोसायटीचे कार्य

Unique project from the banana field to the Yamuna | केळी खोडापासून धागानिर्मितीचा राज्यातील अनोखा प्रकल्प

केळी खोडापासून धागानिर्मितीचा राज्यातील अनोखा प्रकल्प

Next

वासुदेव सरोदे ल्ल फैजपूर, ता.यावल
केळी खोडापासून शेतक:यांना आणखी उत्पन्न मिळावे, केळी खोडांच्या विल्हेवाटीसाठी येणा:या खर्चात बचत व्हावी यासाठी केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग यावल तालुक्यातील चार ठिकाणी सुरू झाला आहे. यामुळे शेतक:यांना उत्पन्न तर मिळतेच, शिवाय 550 जणांना रोजगारही मिळाला आहे. राज्यातील हा एक अनोखा प्रयोग मानला जात आहे.
 राज्यात एकूण 71 हजार 072 हेक्टरवर केळी लागवड केली जाते. यापैकी एकटय़ा जळगाव जिल्ह्यात 44 हजार 302 हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. एका हेक्टरमध्ये सुमारे 4 हजार 444 खोड असतात. एक हेक्टर केळी पिकातून सरासरी 60 ते 80 टन केळी खोड मिळते. शेतकरी ही खोडे बांध अथवा नाल्यात फेकून देतात. यासाठी शेतक:याला कमीत कमी आठ ते दहा हजार रुपये प्रती हेक्टर खर्च येतो.
   शेतक:यांच्या पैशांची बचत व्हावी आणि थोडाफार आर्थिक आधार मिळावा यासाठी ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अॅण्ड प्रॉडक्ट्स को-ऑप. सोसायटीने केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग सुरू केला आहे. या प्रकल्पाची किंमत- 694.05 लाख रुपये इतकी आहे. शासनाने राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत 247.42 लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. यात  शेतक:यांचा सहभाग 111.99 लाख रुपये व संस्थेचा सहभाग  334.64 लाख रुपये इतका  आहे. हा प्रकल्प नवसारी कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर आधारित आहे.   
एका केळीच्या खोडाचे वजन अंदाजे 20 किलो असते. यात 2-3 किलो वजन हे आतील नाजूक भागाचे असते. उर्वरित केळीच्या खोडातून सुमारे 300 ते 400 ग्रॅम धागा व 15 ते 16 किलो भाग हा टाकावू असतो.  यात 7 ते 8 लीटर पाणी असते.
ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अॅण्ड प्रॉडक्ट्स को-ऑप. सोसायटीने  यावल तालुक्यात चार ठिकाणी अर्थात मस्कावद, सातोद, दहिगाव व यावल येथे केळीपासून धागानिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.
यानंतर बोदवड, वरणगाव, खानापूर, हंबर्डी, चिनावल व वाघोड अशा सहा ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ही सहा केंद्रे यशस्वी झाली तर आणखी 10 प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. 
प्रशिक्षण व जागृती-
 केळी उत्पादक तसेच या लघु उद्योग केंद्रात काम करणा:या कर्मचा:यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 खोडाच्या पाण्यापासून  उत्पादने
 केळी खोडातील पाण्यापासून सेंद्रिय द्रवरूप खत तयार करण्याच्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी नवसारी कृषी विद्यापीठाशी करार करण्यात आला  आहे.
 हे द्रवरूप खत ‘ताप्ती एनर्जी’ या नावाने शेतक:यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.  जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्यांशिवाय  मध्य प्रदेश, गुजरात राज्यात या  द्रवरूप खताची मागणी असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
केळी खोडापासून अशी होते धागानिर्मिती
 शेतकरी बांधवांसाठी पथदर्शी असलेला टाकावू केळी खोडापासून धागा व खतनिर्मितीचा प्रकल्प सर्वासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकल्पात पूर्वी शेतक:यांकडून फेकले जाणारे खोड आता 500 रुपये टनाप्रमाणे खरेदी केले जाते. हे केळी खोड प्रकल्पात आणून खोडातील मधोमध असलेला नाजूक भाग वेगळा करण्यात येतो. त्यानंतर खोडाच्या पाकळ्या वेगळ्या केल्या जातात व एक-एक पाकळी मशीनमध्ये टाकून धागानिर्मिती केली जाते. या प्रक्रि येतील टाकावू वस्तू गोळा होते. त्याला प्रेसमध्ये टाकून त्यातील पाणी वेगळे केले जाते. या पाण्यापासून सेंद्रिय द्रवरूप खतनिर्मिती होते व राहिलेल्या टाकावू भागापासून पुन्हा गांडूळ व कम्पोस्ट खत तयार करण्यात येते, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख चेअरमन आमदार हरिभाऊ जावळे व व्हा.चेअरमन डॉ.आर.एम.चौधरी यांनी दिली.  
 केळी खोडाच्या पाण्यात नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जिब्रालिक अॅसिड यासारखे पीकवाढ प्रवर्तक असते. केळी खोडाचे पाणी पिकाला दिल्यास पिकाची वाढ जोमाने होते व रासायनिक खतांच्या खर्चात बचत होते.    
4सद्य:स्थितीला केळी खोडाचे धागे विक्री करण्यात येत आहेत. आतार्पयत 1 हजार 445 किलो धाग्यांची निर्मिती करण्यात आली आहे. आता केळी खोडाच्या धाग्यांपासून हातकागद व बोर्ड निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी पुढील वर्षी करण्याचा मानस या ताप्ती एनर्जी संस्थेचा आहे.

Web Title: Unique project from the banana field to the Yamuna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.