३१ मेपर्यंत विद्यापीठ, महाविद्यालये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 08:09 PM2020-05-17T20:09:21+5:302020-05-17T20:10:16+5:30
जळगाव : कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर, संलग्नित महाविद्यालये व परिसंस्था बंदचा कालावधी ...
जळगाव : कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर, संलग्नित महाविद्यालये व परिसंस्था बंदचा कालावधी येत्या ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला असून या काळात सर्व शिक्षक,अधिकारी व कर्मचारी यांनी घरी बसूनच आवश्यक असेल ती कार्यालयीन कामे करावीत, असे निर्देश देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यापीठातील प्रशासकीय विभाग,प्रशाळा,वसतिगृहे तसेच अमळनेर, धुळे व नंदुरबार येथील उपकेंद्र ३१ मे पर्यंत बंद राहतील. तसेच संलग्नित महाविद्यालये देखील या काळात बंद राहतील. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ही बाब संबधितांच्या निदर्शनास आणून द्यावी असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात आले आहे़ बंदच्या काळात घरी राहून संबंधित विभागाचे कामकाज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़