उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीधर गट निवडणुकीत विकास मंचने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:34 PM2018-01-25T13:34:02+5:302018-01-25T13:37:46+5:30
10 पैकी 8 जागा पटकावल्या
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 25- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीधर गटाच्या 10 जागांपैकी सर्वाधिक 8 जागा विद्यापीठ विकास मंचने पटकावत आपले पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यापीठ विकास आघाडीला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीधर गटाच्या 10 जागांसाठी बुधवारी सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. ही मतमोजणी गुरुवारी दुपारी 11.45 वाजेर्पयत सुरु होती. विद्यापीठ विकास मंचचे दिनेश खरात (अनु.जाती गट, एकूण मते- 5788), अमोल पाटील (ओबीसी, एकूण मते- 6367), नितीन ठाकूर (एसटी), मनीषा चौधरी (महिला गट, 6,271), विवेक लोहार (अनुसूचित जाती-जमाती, 5865), दीपक पाटील, अमोल मराठे व दिनेश नाईक हे आठ उमेदवार विजयी झाले. तर विद्यापीठ विकास आघाडीचे विष्णू भंगाळे व अमोल सोनवणे हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
एसटी गटातील नितीन ठाकूर यांनी जळगावचे उपमहापौर व विद्यापीठ विकास आघाडीचे उमेदवार गणेश सोनवणे यांचा पराभव केला.
बहुमत मिळविल्याने विद्यापीठ विकास मंचचे पदाधिकारी व अभाविपच्या कार्यकत्र्यानी उमवित एकच जल्लोष केला.