जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा शनिवारी पदवीप्रदान समारंभ
By admin | Published: April 7, 2017 01:55 PM2017-04-07T13:55:54+5:302017-04-07T13:55:54+5:30
पदवीप्रदान समारंभ शनिवार, 8 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे.
जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पंचविसावा पदवीप्रदान समारंभ शनिवार, 8 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, समारंभासाठी मुंबईचे रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.ए.बी.चौधरी, परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्यासह विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. या समारंभासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्नातकांसाठी डिग्री कोड देण्यात आला आहे. या पदवी प्रदान समारंभात 32 हजार 161 स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत.