पारोळा येथे रसायन शास्त्रावर विद्यापीठस्तरीय परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:50 AM2019-02-09T00:50:49+5:302019-02-09T00:54:03+5:30

पारोळा येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘रिसेंट अ‍ॅडव्हान्सेस आॅफ केमिकल सायन्स इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

 University level seminar on Chemistry at Parola | पारोळा येथे रसायन शास्त्रावर विद्यापीठस्तरीय परिसंवाद

पारोळा येथे रसायन शास्त्रावर विद्यापीठस्तरीय परिसंवाद

googlenewsNext
ठळक मुद्देकिसान महाविद्यालयात झाला परिसंवाददोन सत्रात मान्यवर प्राध्यापकांचा सहभाग

पारोळा : येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिसेंट अ‍ॅडव्हान्सेस आॅफ केमिकल सायन्स इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रात हा परिसंवाद झाला. प्रथम सत्राचे उदघाटन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर यांनी केले. अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व आमदार डॉ. सतीश पाटील होते. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्राला तज्ञ मार्गदर्शक म्हणून वारंगल एम. आय. टी.येथील प्रा. डॉ. शिरीष एच. सोनवणे उपस्थित होते. त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजीमुळे विज्ञानाच्या क्षेत्रात झालेले कार्य आणि शाश्वत विकासात त्याची भूमिका यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. व्ही. डी. बोबडे, नाशिक, डॉ. मनोहर सोननिस, एम. आय. टी. औरंगाबाद, डॉ. विकास पाटील जळगाव, डॉ. निलेश पवार अमळनेर यांनी मार्गदर्शन केले. परिसंवादास विभिन्न विद्यापीठस्तरीय प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. डी. पाटील व प्रा. ए. एस. पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी आणि आभार परिसंवादाचे सचिव डॉ. बी. एस. भदाणे यांनी मानले. यशस्वीतेकरिता प्राचार्य वाय. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एस. एस. पाटील, प्रा. सी. एम. नेतकर, प्रा. अनिल वाघमारे, डॉ. चंद्रकांत सातपुते, डॉ. पी.पी. पाटील, अभिजित महाजन, गुलाब भोई, देवराम भोगे यांच्यासह रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title:  University level seminar on Chemistry at Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव