विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:16 AM2021-04-11T04:16:01+5:302021-04-11T04:16:01+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दिनांक ११ ते १४ एप्रिल या कालावधीत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ...

At the university, Mahatma Jyotiba Phule and Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Festival | विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव

विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दिनांक ११ ते १४ एप्रिल या कालावधीत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

रविवारी सकाळी १० वाजता प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते संयुक्त जयंती महोत्सवाचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्थानी म. सू. पगारे असतील. महोत्सवाचे उद्घाटनानंतर पुरोगामी चळवळीतील बेगडीपणाच्या अस्तित्वाची अकार्यक्षमता आणि बरगळ यावर परिसंवाद होईल. सोमवारी सकाळी १० वाजता विद्रोही कवी संमेलन व दुपारी २ वाजता शाहीर जलसा होणार आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता ‘भारताचे संविधान आणि राष्ट्रवाद’ विषयावर परिसंवाद होईल तर बुधवार, १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, आर्थिक व राजकीय चिंतन’ या विषयावर डॉ. अशोक ढवळे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

Web Title: At the university, Mahatma Jyotiba Phule and Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.