भुसावळसह 11 स्थानकांसाठी मोबाईल अॅपवरुन अनारक्षीत तिकिट सुविधा

By admin | Published: June 28, 2017 05:56 PM2017-06-28T17:56:42+5:302017-06-28T17:56:42+5:30

मध्य रेल्वेचा डिजीटल इंडियाच्या दिशेने वाटचाल

Unscheduled ticket facility from mobile app for 11 stations including Bhusawal | भुसावळसह 11 स्थानकांसाठी मोबाईल अॅपवरुन अनारक्षीत तिकिट सुविधा

भुसावळसह 11 स्थानकांसाठी मोबाईल अॅपवरुन अनारक्षीत तिकिट सुविधा

Next
>ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.28 - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळसह 11 रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांना आता मोबाईल अॅपवरुन प्रवासाचे अनारक्षित तिकिट जारी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
भुसावळ रेल्वे विभागातील नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला,  बडनेरा, अमरावती, ब:हाणपूर, खंडवा अशा 11 रेल्वे स्थानकांवर मोबाईल अॅपवरुन अनारक्षित (साधारण श्रेणी)  तिकिट देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन भुसावळचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक   सुनील मिश्रा यांनी केले आहे. दरम्यान, साधारण श्रेणीतील तिकिट काढण्यासाठी अडचण आल्यास 138 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
भुसावळ रेल्वेतील पार्सल कार्यालयात ‘स्वाईप’ मशीन
भुसावळ रेल्वे विभागातील नाशिकरोड, भुसावळ आणि अमरावती या मोठय़ा आणि ए-1 व ए श्रेणतील रेल्वे स्थानकांवरील  प्रवासी तिकिट विक्री कार्यालय (बुकिंग ऑफिस), पार्सल आणि माल धक्क (गोदाम) आणि आरक्षण कार्यालयात पीओएस (स्वाईप) मशीन बसविण्यात आली आहे या शिवाय स्थानकांवरील खाद्य पदार्थाचे स्टॉल, बूक स्टॉल, चार पायांचे स्टॉल आदी ठिकाणी पेटीएम व मोबीक्वीकची सोय प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पेटीएम, मोबीक्वीक आणि पीओएस मशीनीच्या सहाय्याने अनारक्षित तिकिट काढणे, प्रवासाचे सामान बूक करणे, मालवाहतुकीचे भाडे अदा करणे आदी आर्थिक व्यवहार करता येतील.

Web Title: Unscheduled ticket facility from mobile app for 11 stations including Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.