जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फेरा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 09:31 PM2021-01-08T21:31:02+5:302021-01-08T21:31:45+5:30

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फेरा सुरुच आहे.

Unseasonal rains continue in the district | जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फेरा सुरुच

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फेरा सुरुच

Next

अमळनेर/भडगाव/पहूर : अमळनेर, भडगाव, पहूरसह परिसरात अवकाळी पावसाचा फेरा कायम आहे. खरीप हंगाम तर हातून गेला, त्यानंतर आता रब्बी हंगामावरही पाणी फिरणार असल्याचे चित्र आहे.
भडगाव तालुक्यात ७ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास  वादळासह जोरदार पाऊस झाला. यात गव्हासह पिकांचे काही प्रमाणात आडवे पडून नुकसान झाले आहे. तसेच ८ रोजीही रात्री व सकाळीही अवकाळी पावसाची तुरळक हजेरी सुरुच होती. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहु, हरभरा, ज्वारी, मका यासह पिकांचे जास्त नुकसान होते की काय, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळातच अवकाळी पावसाने वेळोवेळी थैमान घातल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. भडगाव निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांचेशी संपर्क साधला असता भडगाव तालुक्यात पीक नुकसान झाल्याचे कुठलीच माहिती प्रशासनास मिळाली नाही, असे सांगितले.
पहूर परिसरात शेतकऱ्यावर संकट
पहूर, ता.जामनेर : पहूरसह परिसरात अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढवले आहे. पहूरसह पररिसरात मोठ्या प्रमाणावर गहू हरबरा, ज्वारी, बाजरी पिकांची लागवड झाली आहे. याचबरोबर भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. अवकाळी पावसाने शुक्रवारी हजेरी लावल्याने या पिकांना फटका बसला असून, भाजीपाला उत्पादक ही संकटात सापडला आहे. झालेल्या पाऊसाने पहूर सह परीसरातील   पिंकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Unseasonal rains continue in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.